एटापल्ली : पास असेल तर बसमध्ये बसू नका पैसे असतील तरच बसा असे सांगून विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू न देणाऱ्या चालक व वाहकाविराेधात पालकांनी एटापल्ली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एटापल्लीवरून मोठ्या संख्येने शाळकरी मुली-मुले आलापल्ली येथील शाळेत जातात. बारा वाजतानंतर मुलांची सुटी होते. मात्र आलापल्लीवरून एटापल्लीला येण्यासाठी वेळेवर बस राहत नसल्याने मुले तासनतास बसची प्रतीक्षा करीत बसतात. बुधवारी दुपारी २ वाजता गडचिराेली आगाराची बस आलापल्लीवरून एटापल्लीला येणार हाेती. या बसमध्ये विद्यार्थ्यांनी बसण्याचा प्रयत्न केला असता, चालक व वाहकांनी या बसमध्ये बसण्यास मज्जाव केला. पास असेल तर बसमध्ये बसू नका पैसे असतील तरच बसा असे सांगून बसमध्ये बसूच दिले नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी फाेनवरून पालकांना सांगितली. पालकांनी एकमत करून एटापल्लीचे बसस्थानक गाठले. एटापल्लीला बस पाेहाेचताच चालक व वाहकाला जाब विचारला. तसेच पाेलीस ठाण्यातही घेऊन गेले. बसचालक व वाहकाने आपली चूक झाल्याचे पाेलिसांसमाेर मान्य केले. बसमध्ये गर्दी असल्यांने आपण विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये या असे सांगितले. याबाबत ठाणेदार विजयानंद पाटील यांनी फोन करून आगार प्रमुखांना तक्रारीची माहिती दिली. या प्रकरणाची चाैकशी करणार करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले. विशेष म्हणजे या बसमध्ये सुमारे ८६ प्रवासी बसले हाेते. विद्यार्थ्यांची सुटी झाल्यानंतर आलापल्लीवरून विशेष बस साेडण्याची विनंती पालकांनी उपविभागीय अधिकारी शुभंम गुप्ता यांना केली.
तक्रार देतेवेळी पंचायत समीतीचे उपसभापती जनार्धन नल्लावार, शिवसेनेचे राघवेंद्र सुल्वावार, संपत पैदाकुलवार, पालक विनोद पत्तीवार, स्वाती पत्तीवार, प्रशांत सातपुते, पाैर्णिमा श्रीरामवार, विनोद मोतकुरवार, अभय पुण्यमूर्तीवार, अचलेश्वर गादेवार, दिलीप पुपरेड्डीवार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना बसण्यास बसच्या वाहक-चालकांनी मनाई केली. पास असेल तर बसू नका, पैसे असेलतरच बसा असे म्हणाले. बस सुटल्यानंतर ही बाब विद्यार्थ्यांनी फोन करून आई-वडिलांना सांगितले. एटापल्ली येथे बसस्थानकावर पालक एकत्र गोळा होऊन बस पोचताच बसचालक - वाहकांना जाब विचारला. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली.