गडचिराेली : गावात निर्माण झालेला वाद गावातच मिटविण्याच्या उद्देशाने राज्यात तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात येते. मात्र, पूर्वीच्या तुलनेत तंटामुक्त समित्या निष्क्रिय झाल्या आहेत. काही समित्या तर केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे गावातील वादाच्या तक्रारी आता थेट पाेलीस ठाण्यात दाखल हाेऊ लागल्या आहेत.
गावात अनेक धर्म, पंथ, जाती, उपजाती, विस्थापित, स्थलांतरित नागरिक राहतात. या नागरिकांच्या विविध परंपरा, रीतीरिवाज, सण, उत्सव, वेशभूषा, विचार, आचार आहेत. यामधून कधी-कधी वाद निर्माण हाेतो. सुरुवातीला अगदी दाेन व्यक्तींमध्ये वाद राहतो. हा वाद गावातच साेडविणे शक्य राहते. प्राथमिक स्तरावरच वाद सुटल्यास पाेलीस स्टेशनपर्यंत जाण्याची गरज भासत नाही. या उद्देशाने तंटामुक्त समित्या स्थापन करण्याची संकल्पना राज्य शासनाने पुढे आणली. २००७ मध्ये शासन निर्णय काढून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले.
सुरुवातीच्या कालावधीत तंटामुक्त समित्या अतिशय सक्रिय हाेत्या. पाेलीस स्टेशनमध्ये पाेहाेचण्यापूर्वी नागरिक सर्वप्रथम तंटामुक्त समितीतच तक्रार दाखल करून तडजाेडीने वाद साेडवीत हाेते. जिल्हाभरातून वर्षभरात जवळपास १० हजार तक्रारी प्राप्त हाेत्या. मात्र, मागील दाेन ते तीन वर्षांच्या कालावधीत तंटामुक्त समित्यांमध्येही राजकारण शिरायला लागेल. राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे न्याय मागणाऱ्याला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे तंटामुक्त समित्यांकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या घटत गेली.
२०१९ मध्ये जिल्हाभरातून ३ हजार ६५६ तक्रारी प्राप्त झाल्या, तर २०२० मध्ये केवळ २ हजार ६ ते २५ तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची नाेंद पाेलीस विभागाकडे आहे. यावरून तंटामुक्त समितीकडे न्याय मागणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसून येते.
बाॅक्स....
तंटामुक्त समित्या नावालाच
१५ ऑगस्ट राेजी हाेणाऱ्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती गठित केली जाते. यापूर्वी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष हाेण्यासाठीसुद्धा फार माेठी चढाओढ राहत हाेती. आता मात्र तंटामुक्त समित्यांकडे प्राप्त हाेणाऱ्या तक्रारींची संख्या घटत चालल्याने तंटामुक्त समितीचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य निवडीसाठी फारशी स्पर्धा राहत नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे तंटामुक्त समिती गठित करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक असल्याने नामधारी समिती गठित केली जाते. जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींमध्ये तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
काेट...
पूर्वीइतके तंटामुक्त समित्यांचे महत्त्व राहिले नसले तरी अजूनही काही नागरिक गावातील वाद गावातच साेडविण्यावर भर देतात. त्यामुळे महिन्यातून एक- दाेन तक्रारी प्राप्त हाेतात. दाेन्ही बाजूंच्या नागरिकांमध्ये तडजाेड घडवून आणून वाद साेडविला जाते. त्यामुळे पाेलिसांचा ताण कमी हाेण्यास मदत हाेत आहे.
-शिवराम काेमेटी, तंटामुक्त समिती अध्यक्ष
काेट...
गावातील पंचायतीमार्फत वाद साेडविण्याची सवय गडचिराेली जिल्ह्यातील गावांना आहे. तंटामुक्त समिती हा एक पंचायतीचाच प्रकार आहे. गावातील परिस्थिती गावातील व्यक्तीला माहीत राहते. त्यामुळे नेमकी चूक कुणाची आहे, हे लक्षात घेऊन न्याय दिला जातो. त्यामुळे अजूनही तक्रारी प्राप्त हाेतात.
-सचिन बारसागडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष
बाॅक्स...
जिल्ह्यातील एकूण तंटामुक्त गावे ३६९
प्राप्त तक्रारींचा निपटारा
तक्रारींची संख्या २०१९ २०२०
फाैजदारी तक्रारी ३,६५६ २,६२५
इतर ६८ ७८
एकूण तक्रारी ३,७२४ २,७०१
.............................
मिटविलेल्या तक्रारी
तक्रारींची संख्या २०१९ २०२०
फाैजदारी १,३९५ १,००१
इतर ६८ ६१
एकूण १,४६३ १,०६२
टक्के ३९.२८ ३९.३१