मुख्यमंत्र्यांना निवेदन : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणीअहेरी : अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यात चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, तसेच अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीवर लघु धरण बांधण्यात यावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या संदर्भात अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात अहेरीच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना ११ मे रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहेरी तालुक्यात चेन्ना सिंचन प्रकल्पाचे बांधकाम अर्धवट स्थितीत थांबविण्यात आले. त्यामुळे येथील पाण्याचा ना शेतीला ना सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होत नसल्याचे दिसून येते. यंदा सिंचन प्रकल्पाचे काम केल्यास कृषीचा विकास होईल. तसेच पाणी टंचाई जाणवणार नाही. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सखोल नियोजनाची गरज आहे. नद्यांवर लघु धरण बांधावे जेणे करून नाले व तलावांचे पाणी व्यर्थ जाणार नाही. निवेदन देताना अतुल उईके, क्रिष्णा सडमेक, पार्वता मडावी, विमल मडावी, यशोधा गुरनुले, लक्ष्मी दंडकेवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चेन्ना सिंचन प्रकल्प पूर्ण करा
By admin | Published: May 16, 2016 1:31 AM