भेटीदरम्यान भाजप पदाधिकारी प्रतीक राठी, जयराम चलाख, कंत्राटदार लोकेश शातलवार, महेश मारकवार व नागरिक उपस्थित होते. शहरात सध्या विविध प्रभागातील विविध विकासकामे सुरू आहेत. त्या कामांचा आढावा प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या जागेवर जाऊन घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरात रहदारीसाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. एका बाजूने सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने रस्ता खोदलेला आहे. रस्त्यावर पाणी भरत असल्याने चिखल निर्माण हाेत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन शहरातील कामांना पुन्हा गती देऊन शहरातील मुख्य मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश आ. हाेळी यांनी दिले.
.
240721\img-20210724-wa0058.jpg
कामाची पाहणी करताना आमदार डॉक्टर देवराव होते