लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला विहीर’ या योजनेअंतर्गत आरमोरी तालुक्याला ४५० विहिरींचे लक्ष्य होते. सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. गडचिरोली जिल्ह्यात आघाडी घेत आरमोरी तालुका एप्रिल २०१८ पर्यंत १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणार आहे.सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अटींची पूर्तता करणाºया शेतकºयांना टप्प्याटप्प्याने कार्यारंभ आदेश देण्यात आला. शेतकºयांनीही कार्यारंभ आदेशानुसार विहिरींच्या बांधकामास सुरुवात केली. त्यानंतर तीन ते चार टप्प्यात शेतकºयांच्या बँक खात्यात मंजूर रक्कम जमा करण्यात आली. सिंचन विहिरींचे खोदकाम करणाºया शेतकºयांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली नाही किंवा अधिकाºयांकडे विनवणी करण्याचाही प्रसंग उद्भवला नाही. मजुरांची मजुरी तसेच यंत्राद्वारे खोदकाम करताना यंत्राचे भाडे देताना शेतकºयांना अडचण आली नाही. सध्या आरमोरी तालुक्यातील काही विहिरींचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सदर काम पूर्ण होऊन आरमोरी तालुका १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणार आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्पर आहेत. शेतकºयांना या सिंचन विहिरीतील पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे.‘मागेल त्याला विहीर’ या योजनेला शेतकºयांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सिंचन विहिरींचे जेवढे बांधकाम झाले, त्याप्रमाणात लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना विहिरीच्या अनुदानासाठी त्रास सहन करावा लागला नाही.- एच.टी. तिखे, शाखा अभियंता, जि.प. सिंचन विभाग, देसाईगंज
सिंचन विहिरी पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:25 AM
राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला विहीर’ या योजनेअंतर्गत आरमोरी तालुक्याला ४५० विहिरींचे लक्ष्य होते. सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे.
ठळक मुद्देयंत्रामुळे खोदकामास वेग : आरमोरी तालुक्यात ४५० विहिरींचे काम