लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला असता, बहुतांश कामे अपूर्ण असल्याचे लक्षात आले. विशेष करून केवळ ५० टक्के सिंचन विहिरी पूर्ण झाली असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ३१ मार्चपूर्वी मागील वर्षी मंजूर झालेल्या संपूर्ण विहिरींचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिले.विभागीय आयुक्त हे दोन दिवसांच्या गडचिरोली दौºयावर आहेत. स्वामी विवेकानंद व राष्टÑमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग, अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्यासह उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.धडक सिंचन विहीर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याला प्राधान्य देत सर्वाधिक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. काही विहिरींना उशिरा परवानगी मिळाली. पावसाळ्यामध्ये त्यांचे काम रखडले असल्याची बाब जिल्हापरिषद प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. धानाचे पीक निघाले असल्याने आता तत्काळ कामाला सुरूवात करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. मामा तलाव, बोड्या यांचेही कामे तत्काळ करावे, असे निर्देश दिले.
मार्चअखेर विहिरी पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:16 PM
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला असता, बहुतांश कामे अपूर्ण असल्याचे लक्षात आले.
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे निर्देश : विकास कामांचा घेतला आढावा