लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत दिलेल्या निकालाविरोधात गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन सोमवारी करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.गडचिरोली : गडचिरोली शहरात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. इंदिरा गांधी चौक परिसरात दुकाने बंद होती, मात्र उर्वरित बाजारपेठ सुरू होती. बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, भारिप बमसंचे रोहिदास राऊत, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, मिलिंद बांबोळे, राज बन्सोड, नंदकिशोर भैसारे, जी.के. बारसिंगे, बाळू टेंभुर्णे, सीताराम टेंभुर्णे, जीवन मेश्राम, रोशन उके, समय्या पसुला, दिलीप बारसागडे, सुधीर वालदे, कुसूम आलाम, वनिता बांबोळे, माला भजगवळी, रेखा वंजारी, मिनल चिमुरकर, दर्शना मेश्राम, सुरेखा बारसागडे यांनी पुढाकार घेतला. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत न्यायालयाने दिलेला निकाल अन्यायकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठविले.आष्टी : आष्टी येथील बाजारपेठ दिवसभर बंद होती. आंबेडकर चौकात निषेध सभा घेण्यात आली.भामरागड : भामरागड येथे दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मोर्चाही काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. निवेदन देतेवेळी जि.प. सदस्य लालसू नोगोटी, सभापती सुखलाल मडावी, भारती इष्टाम, उपसभापती प्रेमिला दुग्याजी, रमाबाई टेंभुर्णे, रमेश पुंगाटी हजर होते.आलापल्ली : आलापल्ली येथे बंदला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. आलापल्ली शहरातील बाजारपेठ सुरू होती.कुरखेडा : कुरखेडा येथे ११ वाजता बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकाने सुरू झाली होती व दिवसभर बाजारपेठ सुरूच होती. बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. कुरखेडा तालुक्यातील पलसगड व पुराडा परिसरातही बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही.आरमोरी : आरमोरी हे मोठे शहर आहे. मात्र आरमोरी शहरातही बंदला प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभर बाजारपेठ सुरू होती.अहेरी : कार्यकर्त्यांनी दुपारी १२ वाजता बंदचे आवाहन केले. बंदच्या आवाहनानंतर काही दुकानदारांनी दुकाने बंद केली. बंद यशस्वी करण्यासाठी छत्रपती अलोणे, दीपक सुनतकर, अखिल रामटेके, बंटी मडावी, हितेश इष्टाम, आकाश् इष्टाम, राजू दुर्गे, चेतन दुर्गे, कांता कांबळे, पौर्णिमा इष्टाम, नारायण अलोणे, महेश अलोणे, मनिष वाघाडे, किशोर येरमे, संजय अलोणे, सोनू तोरे, आशा तोरे यांनी सहकार्य केले. पेरमिली येथेही बंद पाळण्यात आला.कोरची : कोरची येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविले. यावेळी शालिक कराडे, नकुल सहारे, सुडाराम सहारे, हिरालाल राऊत, हिवराज कराडे हजर होते.सिरोंचा : सिरोंचा येथे सोमवारी आठवडी बाजाराचा दिवस होता. संपूर्ण बाजारपेठ सुरू होती.मुलचेरा : मुलचेरा शहरात बंदला प्रतिसाद मिळाला नाही. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधांना पाठविण्यात आले. यावेळी मुचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम, दिलीप आत्राम, दीपक परचाके, प्रफुल्ल दुर्गे, चंद्रशेखर डोर्लीकर, रमेश कुसनाके, सुरेंद्र मडावी, सुरज नैताम, दिनेश येरमे हजर होते.
बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:08 PM
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत दिलेल्या निकालाविरोधात गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन सोमवारी करण्यात आले होते. या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देशासनाला निवेदन : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील निकालाचा दर्शविला विरोध