लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील विविध संघटनांच्या वतीने २९ जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याच धरतीवर बहुजन क्रांती मोर्चा तर्फे २९ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनाला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, दर बुधवारी गडचिरोली येथील बाजारपेठ बंदच राहते. काही दुकानदारांनी दुकाने सुरू केली होती. मात्र बंदचे आवाहन केल्यानंतर दुकाने बंद ठेवण्यात आली. जवळपास १२ वाजेपर्यंत दुकाने बंद होती. त्यानंतर सर्वच दुकाने सुरू झाली. तालुकास्तरावर मात्र बंदचा अजिबात प्रभाव जाणवला नाही.बंदत सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित केली. या सभेत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात टीका केली. केंद्र शासनाने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा. तसेच एनआरसीची प्रक्रियाही रद्द करावी, या मागणीसाठी निदर्शने देण्यात आली. त्यानंतर शहरात फिरून दुकाने बंद केली. दुकानदारांनीही प्रतिसाद देत काहीकाळ दुकाने बंद ठेवली, त्यानंतर पुन्हा सुरू केली. बंदला बहुजन क्रांती मोर्चा, रिपब्लिकन फोरम, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय मुस्लीम फोर्स, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी, आंबेडकरवादी विचारमंच, बामसेफ, पिरीपा, सत्यशोधक विचारमंच, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, ओबीसी युवा महासंघ, व्यापारी वाहतूक संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, पानठेला फुटपाथ सेवा संघटना, भारतीय विद्यार्थी मोर्चा आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. बंदसाठी जनार्धन ताकसांडे, मुनीश्वर बोरकर, रोहिदास राऊत, एजाज शेख, राज बन्सोड, शामकांत मडावी, शेख इमरान, एजाज शेख, प्रमोद बांबोळे, भोजराज कान्हेकर, विलास निंबोरकर, प्रमोद राऊत, तुकाराम दुधे, जगण जांभूळकर, रेखा वंजारी यांनी पुढाकार घेतला.
भारत बंदला गडचिरोली शहरात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM
बंदत सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित केली. या सभेत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात टीका केली. केंद्र शासनाने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा. तसेच एनआरसीची प्रक्रियाही रद्द करावी, या मागणीसाठी निदर्शने देण्यात आली. त्यानंतर शहरात फिरून दुकाने बंद केली. दुकानदारांनीही प्रतिसाद देत काहीकाळ दुकाने बंद ठेवली, त्यानंतर पुन्हा सुरू केली.
ठळक मुद्देचौकात दिली धरणे : केंद्र शासनाच्या धोरणांचा विरोध; अनेक संघटनांचा सहभाग