९५ प्रकरणे : विविध प्रकारच्या विषयांचा समावेशगडचिरोली : जिल्हा न्यायालयात गडचिरोली न्यायिक जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याकरिता लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या लोक अदालतीत एकूण ९५ प्रकरणांपैकी आठ प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढण्यात आली. सिव्हिल व रेव्हन्यू विषयावर मासिक राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ९५ प्रकरणांपैकी आठ प्रकरणे आपसी तडजोडणीने निकाली काढण्यात आली असून १ लाख रूपयांची तडजोड करण्यात आली. जिल्हा न्यायालयात पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) टी. के. जगदाळे, पॅनल सदस्य अॅड. पल्लवी केदार, सामाजिक कार्यकर्ता आर. आय. गौर यांनी काम पाहिले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, सहायक जिल्हा सत्र न्यायाधीश एस. टी. सूर, सह दिवाणी न्यायाधीश एल. डी. कोरडे, सह दिवाणी न्यायाधीश एस. एच. अटकारे उपस्थित होते. यावेळी मांडण्यात आलेल्या प्रकरणांवर तडजोड करून सामंजस्याने प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्रीय लोक अदालतीत आठ प्रकरणांवर तडजोड
By admin | Published: March 14, 2016 1:25 AM