आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरविलेले सिमेंट काँक्रिट पाईपने पाणी मारताना उखडत आहे. रस्त्यावर गिट्टी निघत आहे. त्यामुळे या कामात बोल्डर, सिमेंट कमी व रेतीचे प्रमाण अधिक असल्याचे बांधकामावरून दिसून येत आहे. या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.आमोरी पंचायत समितीमार्फत महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायतने २०१५-१६ या सत्रात कोणतेही अकुशल काम केले नाही. अशाच ग्रा.पं.च्या गावात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे नियमबाह्य बांधकाम करण्यास मूक संमती दिली. अरसोडा येथील दुर्गा मंदिर ते दिगांबर ढोरे यांच्या घरापर्यंत १५० मीटर लांब व ४ मीटर रूंदीचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत आहे.या कामात ८० एमएम गिट्टी कमी, रेती अधिक तसेच सिमेंट कमी वापरले जात असल्याने पाईपने रस्त्यावर पाणी मारताना संपूर्ण बेड काँक्रिट उखडत आहे. रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी बाहेर पडत आहे. त्यामुळे चार-सहा महिन्यांत रस्त्याला भेगा पडून खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळपास १५ ते २० लाख रूपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. परंतु या कामावर संबंधित अभियंता किंवा कंत्राटदार कधीच राहत नाही. काँक्रिट रोड तयार करताना बांधकाम साहित्य व बांधकामाचा दर्जा योग्य प्रकारे व्हावा, याकरिता संबंधित लोकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु जबाबदार अधिकाºयांच्या देखभालीअभावी येथील काम दुसºयाच्या भरवशावर सुरू आहे. केवळ टेबलावरून कामाची अंमलबजावणी करण्यावर अधिकाºयांचा भर असल्याचे दिसून येते.येथील रस्त्याचा दर्जा घसरू नये म्हणून रोहयो विभागातील जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी कामाची चौकशी करावी. नियमबाह्य काम करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.अरसोडा गावातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम दर्जेदार आहे. २० एमएम च्या काँक्रिटला योग्य व मजबूत पकड मिळावी म्हणून जाणीवपूर्वक बेड काँक्रिटचे काम त्या पद्धतीने केलेले आहे.- खेमराज पत्रे,सरपंच, ग्रामपंचायत अरसोडा
पाणी मारताच उखडले काँक्रिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:59 PM
आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरविलेले सिमेंट काँक्रिट पाईपने पाणी मारताना उखडत आहे. रस्त्यावर गिट्टी निघत आहे. त्यामुळे या कामात बोल्डर, सिमेंट कमी व रेतीचे ...
ठळक मुद्देमग्रारोहयोतून काम : अरसोडाच्या सिमेंट रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी