रेगडी मार्गाने रेगडी, विकासपल्ली, देवदा, एटापल्ली, कसनसूर, छत्तीसगडला जोडलेला मार्ग आहे, तसेच रेगडी येथील कन्नमवार जलाशय बघण्यासाठी पर्यटक या भागात माेठ्या संख्येने येतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची रेलचेल असते. या मार्गाने रात्री-अपरात्री चारचाकी, दुचाकी व जड वाहने, तसेच एसटी बसही अवागमन करीत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घोट-रेगडी मार्गावरील घोट ते पोतेपल्ली टोलापर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, मार्ग उखडलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गावर असलेले खड्डे बुजविण्यात यावे व घोट ते पोतेपल्ली टोलापर्यंत नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी घोट व रेगडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
140921\img-20210724-wa0001.jpg
घोट- रेगडी मार्गावर असलेले खड्डे