जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
थंडीमुळे फिरणाऱ्यांची संख्या घटली
रांगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शारीरिक व्यायामाकडे लक्ष देणे सुरू केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास थंडी पडत असल्यामुळे मार्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात घटली आहे.
बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
कुरूड : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवांकडून होत आहे.