जलसंपदा विभाग नागपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर व सिंचन उपविभाग चामोर्शी शाखा घोटच्या अंतर्गत येत असलेल्या रेगडी येथे सन १९७३ ते १९७४ साली विश्रामगृह बांधण्यात आलेले होते. दरम्यान, सन २००६ मध्ये नक्षलवाद्यांकडून या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेला १५ते १६वर्षाचा कालावधी उलटला आहे. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हे जिल्हातील एकमेव मोठे जलाशय आहे. तसेच या जलाशयावर वनविभागाने वनाेद्यान उभारलेले आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येंने पर्यटक दरराेज येतात. परंतु पर्यटकांना विश्राम करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे जुने विश्रामगृह दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात आमदार डॉ. देवराव होळी व बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरपंच बाजीराव गावडे, उपसरपंच रमेश दयालवार, बाजीराव तलांडे, प्रशांत शाहा, कोतू पोटावी, तोंदेश तलांडे, उमेश मल्लीक, आकाश कुळमेथे व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रेगडीच्या विश्रामगृहाची दुरवस्था कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:32 AM