एसटीच्या सेवेत असताना एकूण वेतनातून काही रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ही रक्कम मिळणे आवाश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्याने पीएफची रक्कम यापूर्वी काढली नसेल तर त्याला लाखाेंच्या जवळपास ही रक्कम मिळते. साेबतच ग्रॅच्युइटीचाही लाभ दिला जाते. सेवानिवृत्तीच्या काही दिवसानंतर ही रक्कम मिळणे आवश्यक आहे. मात्र ती मिळण्यास विलंब हाेत आहे. काही एसटी कर्मचाऱ्यांना तर सेवानिवृत्तिवेतनही वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
सेवानिवृत्तिवेतन तरी मिळणार काय
एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनातून काही रक्कम सेवानिवृत्तिवेतनासाठी कपात केली जाते. सेवानिवृत्तिवेतनाची रक्कम कमी असली तरी ती एसटी कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्याला ही रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले असल्याचे दिसून येत आहे.
काेट
आपण संपूर्ण आयुष्य एसटीच्या सेवेत खर्ची घातले. अतिशय कमी वेतनात काम मिळाले. आता आपण सेवानिवृत्त झालाे आहे. सेवानिवृत्तीनंतर तरी सुखाने जगता येईल अशी अपेक्षा हाेती. मात्र पीएफ व ग्रॅच्युइटीची रक्कम मिळविण्यासाठी हाल ससेहाेलपट सहन करावी लागत आहे.
- सेवानिवृत्त एसटी कर्मचारी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बसचालक-३३६
वाहक - २७४
इतर कर्मचारी- १०६