विविध मागण्या : अखिल भारतीय अनुसूचित जाती संघाचे आंदोलनगडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी सर्व स्तरातून होत असताना अखिल भारतीय अनुसूचित जाती संघाच्या वतीनेही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ९ मे रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी सशर्त धरणे आंदोलन केले. या आंदोलनातून शासनापुढे विविध मागण्या अनुसूचित जाती संघाच्या वतीने ठेवण्यात आल्या.अनुसूचित जाती, जमातींकडून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत भूमिका स्पष्ट केली जात आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे समर्थन अनुसूचित जाती करीत आहेत. परंतु स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करताना विविध शर्तींची पूर्ती होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध सुधार कायदा २०१६ मध्ये दुरूस्ती करून शिक्षेची टक्केवारी वाढविण्याची मागणी तसेच इतर मागण्या मान्य असतील तर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करणे गैर नाही, अशी भूमिका अखिल भारतीय अनुसूचित जाती संघाच्या वतीने धरणे आंदोलनाद्वारे घेण्यात आली. धरणे आंदोलनानंतर शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या आंदोलनात विविध १३ संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती आॅल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)विदर्भ राज्य निर्मितीच्या शर्तीस्वतंत्र विदर्भ राज्याची राजभाषा हिंदी असावी, विदर्भ राज्याचे नामकरण ‘नागविदर्भ’ करावे, विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात अनुसूचित जाती, जमातींची संख्या आरक्षणातील टक्केवारीनुसार असावी, सध्याची निवडणूक प्रक्रिया बदलून बहुसदस्सीय निवडणूक क्षेत्र निर्मिती करावी तसेच निवडणूक संचित प्रक्रियेनुसार घ्यावी, केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य व अन्य राज्यांच्या निर्मितीत अनुसूचित जातींची संमती घ्यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून बेरोजगार भत्ता मिळावा आदी शर्ती आहेत.
विदर्भ राज्यासाठी सशर्त निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 1:17 AM