गडचिराेली : दुसऱ्या लाटेत काेराेनाने अनेक जणांचा बळी घेतला. अगदी ३० ते ४० या वयाेगटातील तरूण व्यक्तीही काेराेनामुळे मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे काेराेनाची दहशत निर्माण झाली. मात्र, ९० वर्षांवरील १० जणांनी काेराेनावर मात केली आहे.
काेराेनाचा सर्वाधिक धाेका एखादा जुना आजार किंवा वयाेवृद्ध नागरिकांना हाेता. त्यामुळे काेराेना हाेणार नाही, याची सर्वाधिक काळजी घेण्याचे आवाहन या वर्गाला केले जात हाेते. तरीही कळत, नकळत काेराेनाची लागण हाेत हाेती. ८१ ते ९० वयाेगटातील मे महिन्यापर्यंत १०१ जणांना काेराेनाची लागण झाली. त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला. ८२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. विशेष म्हणजे ९१ ते १०० या वयाेगटातील एकूण १० जणांना काेराेनाची लागण झाली. मात्र, त्यापैकी एकाही व्यक्तिचा मृत्यू झाला नाही. काेराेनाच्या विराेधात त्यांनी केलेली लढाई इतर काेराेनाबाधितांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
बाॅक्स...
६१ ते ७० वयाेगटात सर्वाधिक मृत्यू
१) ६१ ते ७० या वयाेगटातील १ हजार ९५७ नागरिकांना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. १० वर्षांचा वयाेगट लक्षात घेतला तर या वयाेगटातील नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
२) ५१ ते ६० या वयाेगटातील नागरिकांचाही यात समावेश आहे. या वयाेगटातील ३ हजार ६३९ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली, तर १८६ जणांचा मृत्यू झाला.
३) ४१ ते ५० या वयाेगटातील ५ हजार ३९ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी १३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
काेट...
हात-पाय दुखायला लागल्यानंतर घरच्या व्यक्तींनी काेराेनाची चाचणी करण्याचा आग्रह केला. त्यानुसार चाचणी केली असता रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, याेग्य वेळी औषधाेपचार घेतल्याने काेराेनावर मात करणे शक्य झाले. वृद्ध नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- काेराेनावर मात करणारा वृद्ध नागरिक
.....................
पूर्वीच्या काळीही काेराेनासारख्या इतर राेगांच्या साथी येत हाेत्या. या साथींमधून आपण वाचलाे आहे. वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत शारीरिक श्रम केले आहेत. आताही काही अंतर चालून येताे. त्यामुळे आपले शरीर मजबूत आहे. ताप आला तरी आपण सहजासहजी लस घेत नाही. त्यामुळे काेराेनावर मात करू, असा आपल्याला सुरुवातीपासूनच विश्वास हाेता.
- काेराेनावर मात करणारा वृद्ध नागरिक
बाॅक्स...
९० पेक्षा जास्त वयाचे पाॅझिटिव्ह - १०
बरे झालेले रुग्ण - १०
बाॅक्स...
अशी आहे आकडेवारी
पाॅझिटिव्ह
पहिली लाट - ९,०४१
दुसरी लाट - १८,४२६
बळी
पहिली लाट - १०६
दुसरी लाट - ६१३