कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुंभरे, चंद्रकांत चहारे, आरोग्य सेविका अर्चना चौधरी, मनीषा जेवारे, भूषण कुथे, लोमेश चाफले, वृषाली गहाणे, निकिता बन्सोड, हर्षा गायकवाड, पूजा गायकवाड, रिना भोयर, जोत्स्ना रामटेके, आशानंद सहारे, मोहन गेडाम, बी. एन. वाढई, मारोती पेंदाम, आदी आरोग्य कर्मचारी व परिचारिका उपस्थित होते.
देसाईगंज तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर, मास्क वितरण, गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासह विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, कोरोना कालावधीत नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने लसीकरण, लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्वॅब नमुने घेणे, बाधित रुग्णांवर उपचार होण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच गृहविलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांची दैनंदिन तपासणी करून तसा अहवाल सादर करण्यात कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी तसेच परिचारिकांनी मौलिक भूमिका बजावली. याची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे, तालुका अध्यक्ष मिलिंद सपाटे, जिल्हा संघटक-सचिव मनोज ढोरे यांनी पुढाकार घेत सत्कार केला.
===Photopath===
120521\12gad_4_12052021_30.jpg
===Caption===
आराेग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना रायुकाॅंचे पदाधिकारी.