गडचिरोलीत निदर्शने : भाजप सरकार सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोपगडचिरोली : खोटी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र सत्ता मिळताच जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसला प्रचंड यश मिळाले आहे. काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याचे पाहून भाजपच्या राज्य सरकारने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. सरकारची ही कारवाई सुडबुद्धीने असल्याने गुरूवारी सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्थानिक इंदिरा गांधी चौकात भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे. याप्रसंगी आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, महासचिव पंकज गुड्डेवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल भडांगे, सोशल मीडियाचे अध्यक्ष नंदू वाईलकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, नगरसेवक लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, बाशिद शेख, प्रतिक बारसिंगे, प्रतिभा जुमनाके, जीवन कुत्तरमारे, कुणाल पेंदोरकर, तौफिक शेख जावेद शेख, केवलराम नंदेश्वर, कमलेश खोब्रागडे, हेमंत मोहितकर, राकेश गणवीर, गौरव आलाम, अमर दातारकर, रोहित सादुलवार, बाळू मडावी आदी उपस्थित होते. यावेळी खा. अशोक चव्हाण यांच्या पाठीशी संपूर्ण जिल्हा ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन डॉ. उसेंडी यांनी केले.
प्रदेशाध्यक्षावरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक
By admin | Published: February 12, 2016 1:50 AM