भाजप सरकारच्या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. दरराेज पेट्राेल व डिझेलच्या किमतीत वाढ हाेत असल्याने महागाईचे चटके जनतेला सहन करावे लागत आहेत. नाेटबंदी, जीएसटी अपयशी ठरले आहेत. देशात बेराेजगारी वाढत आहे. शासनाने केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेणार आहे, असा आराेप करीत काॅंगेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून आंदाेलन करण्यात आले.
यावेळी काेषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घाेटेकर, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, सचिव एजाज शेख, काशीनाथ भडके, मिलिंद बागेसर, रामदास टिपले, लहूकुमार रामटेके, राकेश रत्नावार, तुळशीदास भाेयर, दिवाकर मिसार, दाैलत धुर्वे, ढिवरू मेश्राम, सुभाष धाईत, महादेव भाेयर, चाेखाजी भांडेकर, लक्ष्मण काेवे, वसंता राऊत, घनश्याम वाढई, गणेश काेवे, प्रा. भाष्कर नरुले, मुनिंद्र म्हशाखेत्री, कल्पक मुपीडवार, जावेद खान, परशुराम गेडाम, इमरान शेख, कल्पना नंदेश्वर, पाैर्णिमा भडके, निला निंदेकर, प्रियंका खाेब्रागडे, इंदिरा मुनघाटे आदी उपस्थित हाेते.