काँंग्रेसचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:26 AM2018-12-01T01:26:04+5:302018-12-01T01:36:36+5:30
तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील शेतकरी यंदा हवालदिल झाले आहेत. अशातच धान कापणीला महिना लोटून सुद्धा कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी अल्पदरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आक्रमक झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्याकरिता उपप्रादेशिक व्यवस्थापक कोरची यांच्याकडून आश्वासन देण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांनी ‘आम्हाला आश्वासन नको तर अमलबजावणी हवी’ अशा घोषणा करून जवळपास दोन तास चक्काजाम आंदोलन सुरू ठेवले. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली व तीनही खरेदी केंद्र सुरु करण्याचे मान्य केले. कोटरा येथे आविका यांच्या माध्यमातून व बोरी व बेडगाव येथे महामंडळातर्फे खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर दोन तास सुरु असलेले चक्काजाम आंदोलन तालुका काँग्रेस कमेटी व शेतकºयांकडून मागे घेण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार बोक्के, कोरची पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफडे, उपपोलीस निरीक्षक महेश कोंडुभैरी उपस्थित होते. चक्काजाम आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष श्यामलाल मडावी, सदरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, कचरीबाई काटेंगे, जगदीश कपूरडेहरिया, प्रमिलाताई काटेंगे, हेमंताबाई शेंडे, धनराज मडावी, हर्षलता भैसारे, राहुल अंबादे, रुकमन घाटघूमर, वसीम शेख, उद्धव कोरेटी, तुलाराम मडावी, लहानू सहारे, कांताराम जमकातन, तुळशीराम बावनथडे, मोहन कुमरे, रामू नैताम, धरमसाय कोवाची, मानसिंग नैताम, जगदीश काटेंगे, तुलाराम मडावी, रामचंद्र मेश्राम, मदन कोल्हे, घनश्याम फुलकुवर, रवी नंदेश्वर, सुंदर दर्रो, शांताराम बोगा, निर्मल पुळो, रामदास घावडे व बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कोरची पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.