एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 02:27 PM2022-02-14T14:27:02+5:302022-02-14T15:44:24+5:30
काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काँग्रेस-आविस सत्ता बसली.
गडचिरोली : एटापल्ली नगरपंचायतमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने नगराध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाकरीता चांगलीच जुळवा-जुळव करावी लागली. यात काँग्रेसच्या नगरसेविका दिपयंती पेन्दाम अविरोध तर उपाध्यक्ष पदाकरिता आविसच्या मिनाताई पोचरेड्डी नागुलवार व राकाॅचे जितेंद्र दशरथ टिकले उभे होते. यात नागुलवार यांना १० तर टिकले यांना ०६ मते मिळाली.
कााँग्रेसचे नगरसेवक किसन जुरु हिचामी यांनी कुणालाही वोटींग केले नाही. मतदान प्रकिया हात उंचावून पार पाडली. काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काॅग्रेस-आविस सत्ता बसली.
विशेष म्हणजे आविसचे दोन सदस्य असतांना आविसला उपाध्यक्ष संधी मिळाली. जितेंद्र टिकले यांना राकाॅ ३ व भाजप ३ असे ६ मते मिळाले. पाठाशिन अधिकारी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी. लोडें होते. काॅग्रेस-आवीस सत्ता बसविण्याकरीता, संजय चरडुके, विनोद चव्हान, रमेश गंपावार, प्रज्वल नागुलवार यांचासह अनेकांनी महत्वाची भुमीका पार पाडली.