लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी खा. मारोतराव कोवासे, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवका काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, एजाज शेख, हसन गिलानी, जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, सी.बी. आवळे, प्रभाकर वासेकर, पी.टी. मसराम, महादेव भोयर, शंकर सालोटकर, नीलिमा राऊत, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, हरभाजी मोरे, विश्वजीत कोवासे, कमलेश खोब्रागडे, किशोर चापले, कल्पना नंदेश्वर, हेमंत भांडेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेवक सतिश विधाते, संचालन एजाज शेख यांनी केले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाजपाच्या धोरणांवर टीका केली. भारतीय जनता पार्टी मतांसाठी जनतेमध्ये मतभेद निर्माण करीत आहे. फोडा व राज्य करा हे इंग्रजांचे धोरण भाजपा शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळे भाजप शासनाच्या कालावधीत सर्वाधिक मोर्चे, आंदोलन झाली आहेत. शासनाच्या धोरणाविरोधात जनता संतप्त आहे, अशी टीका केली.आरमोरीतही आंदोलनआरमोरी येथे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, पं.स. सभापती बबीता उसेंडी, कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत हरडे, कुरखेडाचे पं.स. सभापती गिरीधर तितराम, जि.प. सदस्य वनिता सहाकाटे, माजी जि.प. सभापती आनंदराव आकरे, पं.स. सदस्य वृंदा गजभिये, किरण म्हस्के, आरमोरी तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष मंगला कोवे, माजी पं.स. सभापती अशोक वाकडे, रामभाऊ हस्तक, नामदेव सोरते, मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, आर. पी. लहरी, डॉली नंदेश्वर, चंदू वडपल्लीवार, यज्ञकला ठवरे, कुरंडी मालचे सरपंच टिकेश कुमरे बेबी सोरते, नरेंद्र टेंभुर्णे, नरेंद्र गजभिये, बेबी सोरते यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाविरोधात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:02 PM
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरण व भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात सोमवारी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.
ठळक मुद्देधोरणांवर टीका : शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात असल्याचा आरोप