शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

एटापल्लीत काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:31 AM

एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात.....

ठळक मुद्दे शासनाच्या विरोधात नारेबाजी : एसडीओंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शेतकरी, शेतमजुरांचा विशाल मोर्चा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयवर काढण्यात आला. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली.या मोर्चाची सुरुवात पेपर मिल कॉलनीपासून करण्यात आली. मुख्य मार्गाने मोर्चा आगेकुच करीत एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. शेतकरी, शेतमजूर सहभागी असलेल्या या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. येथे जि.प. सदस्य संजय चरडुके, पं.स. सदस्य शालिक गेडाम, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गम्पावार, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, हरीदास टेकाम यांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले.यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी विद्यमान केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी असल्याचे सांगितले. विद्यमान सरकारच्या काळात शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. मात्र या सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना सरसकट कर्ज माफीचा लाभ दिला नाही. एकूणच शेतकºयांच्या प्रश्नाप्रती हे सरकार गंभीर नाही, अशी टीकाही पदाधिकाºयांनी यावेळी केली.त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ कार्यालयाचे नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले. या मोर्चात जि.प. सदस्य ऋषी पोरतेट, नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले, बांधकाम सभापती किसन हिचामी, नगरसेवक ज्ञानेश्वर रामटेके, तानाजी दुर्वा, नगरसेविका दीपयंती पेंदाम, विनोद चव्हाण, मनोहर हिचामी, डॉ. ढोके, मोहन नामेवार, उषा ठाकरे, बंटी जुनघरे, उमेश मडावी, राकेश लोनबले, राकेश बोनपल्लीवार, पुनेश्वर खोब्रागडे, अनिल कांबळे, शुभम दुर्वा, मंदा गेडाम, श्यामला मडावी, सुनंदा उईके, वर्षा उसेंडी, अनिल तेलकुंठलवार आदींसह नागरिक उपस्थित होते.या आहेत निवेदनातील मागण्याएटापल्ली तालुक्यातील जबरानजोत जमिनीवरील प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून पट्टे वाटप करण्यात यावे.जारावंडी-कसनसूर-एटापल्ली रस्त्याचे मजबुतीकरण तसेच कांदळी व झुरी नाल्यावरील पुलाच्या बांधकामास निधी देऊन काम सुरू करावे.पिपली बुर्गी येथील मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे.शेतीविषयक योजनेच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथील करून पूर्वीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात यावा.जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी न्यायालयीन प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे तालुका दंडाधिकाºयांकडे देण्याची प्रक्रिया सुरू करावी.शेतकºयांना सरसरकट कर्जमाफी करून सातबारावरील बोजा कमी करावा.