लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड व तेलंगाणा राज्याचा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून येथे विविध समस्या आवासून आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही येथील समस्या निकाली काढण्यात येत नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेयेथील जनतेच्या रास्त मागण्यांकरिता माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जि.प.च्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सिरोंचा तहसीलवर धडकले.मोर्चाची सुरुवात कोत्तागुडम येथून करण्यात आली. विविध मागण्यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, अशा घोषणात सिरोंचा मुख्यालय हादरून गेला. यावेळी बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा उपाध्यक्ष फईमभाई काजी, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापत्रे, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, उपाध्यक्ष कलाम भाई, सत्यम पिडगू, रायुकाँचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास कडार्लावार, पं.स. उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला, उज्वल तिवारी, राकाँचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.या आहेत प्रमुख मागण्यातालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून जिल्हा निवड समिती अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य देऊन भरती प्रक्रियेवर आणलेली बंदी हटवून त्वरित भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. अंतर जास्त असल्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी सिरोंचावासीयांना अडचण निर्माण होत असून शासकीय व इतर खासगी कामाकरिता जाणाऱ्यांना मुक्काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अहेरी हा नवीन जिल्हा घोषित करावा, सिरोंचाला उपजिल्हा घोषित करावे, उपजिल्हा सिरोंचा अंतर्गत नवीन दोन तालुक्याची निर्मिती करावी, मेडिगड्डा प्रकल्पपीडित नुकसान ग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, सिरोंचा ते आसरअली मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, स्थानिकांना बांधकाम कामाकरिता आवश्यक असलेल्या रेतीची व्यवस्था करण्यात यावी, खेड्यापाड्यातील लोकांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, वनहक्क पट्टे वाटप करण्यात यावे, तसेच सिरोंचा तालुका मुख्यालयात १०० खाटांचे रुग्णालय तयार करून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
सिरोंचा तहसीलवर धडकला राष्टÑवादी काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:54 PM
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड व तेलंगाणा राज्याचा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून येथे विविध समस्या आवासून आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही येथील समस्या निकाली काढण्यात येत नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेयेथील जनतेच्या रास्त मागण्यांकरिता माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात जि.प.च्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सिरोंचा तहसीलवर धडकले.
ठळक मुद्देशेकडो नागरिक सहभागी : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर, नोकरीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी