शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

काँग्रेस सदस्य नोंदणी मोहिमेला सुरूवात

By admin | Published: November 20, 2014 10:52 PM

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत

गडचिरोली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी कार्यक्रम प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सदस्य रविंद्र दरेकर, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव, पंकज गुड्डेवार आदी उपस्थित होते. यावेळी रोहिदास पाटील यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची असून नेहरू गांधी यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून देशाचा विकास झाला. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे वक्तव्य म्हणजे, देशातील मानसाचे स्वातंत्र्य व विकास नाकारण्याची भाषा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी डॉ. उसेंडी यांनी यंदा पाऊस उशीरा आल्याने जिल्ह्यातील धान उत्पाादकाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयाची आर्थिक मदत व साडेतीन ते ४ हजार रूपये भाव धानाला द्यावा, अशी मागणी करीत हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला हसन गिलानी, रविंद्र दरेकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सदस्य नोंदणी मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, भामरागडचे तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मुक्तेश्वर गावडे, मेहबूब अली, पांडुरंग घोटेकर, डी. डी. सोनटक्के, सतिश विधाते, सुखमाबाई जांगधुर्वे, प्रतिभा जुमनाके, माया मोहुर्ले, कल्पना वड्डे, दर्शना लोणारे, आशा बांबोळे, लता पेदापल्ली, दर्शना मेश्राम, अमिता मडावी, रेखा मडावी, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, नरेंद्र भैसारे, पी. टी. मसराम, तुळशीदास भोयर, किशोर चाफले, अशोक चलाख, मिलिंद किरंगे, रवी उसेंडी, प्रमोद देविकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मिलिंद बागेसर, रविंद्र पाल, सुशिल शहा, थुटाराम बांबोळे, लक्ष्मण कोवे, बंडू आत्राम, चैतू आत्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)