लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी उपजिल्हा रूग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी आंदोलन करण्यात आले.सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, मुलचेरा या पाच तालुक्यांचा भार अहेरी उपजिल्हा रूग्णालयावर आहे. त्यामुळे या रूग्णालयात दुर्गम भागातून आलेल्या गरीब रूग्णांची मोठी गर्दी राहते. मात्र रूग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका बसतो. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांचे अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, रूग्णालयात एक्स-रे टेक्नीशीयनचे पद भरण्यात यावे, ग्रामीण रूग्णालयात रक्तसंकलन केंद्रांची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्राध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पंकज गुड्डेवार, कुणाल पेंदोरकर, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, एजाज शेख, विश्वजीत कोवासे, आशिष कन्नमवार, डॉ. पप्पू हकीम, पंकज बारसिंगे, गौरव आलाम, मोहम नामेवार, मेहबुब अली, मुस्ताक हकीम, महाराज परसा, उमेश पेंडूरकर यांनी सहभाग घेतला. मागण्यांचे निवेदन उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले. मागण्यांसंदर्भात त्यांच्या सोबत चर्चाही करण्यात आले.
अहेरी रूग्णालयात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:48 AM
अहेरी उपजिल्हा रूग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देरिक्त पदांमुळे रूग्णांची हेळसांड : समस्यांबाबत युवक काँग्रेस पदाधिकाºयांनी केली चर्चा