लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील समस्या सांडविण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.एटापल्लीवरून जाणाºया जारावंडी-कसनसूर मार्गावरील झुरी नाला व कांदळी नाल्याची दुरूस्ती करावी, कसनसूर, गट्टा येथे ३३ के व्ही विद्युत केंद्र स्थापन करण्यात यावे, एटापल्ली उपविभागातील आदिवासी व पारंपरिक निवासी अतिक्रमणधारक शेतकºयांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून त्वरित पट्ट्यांचे वाटप करावे, जारावंडी व कसनसूर या ठिकाणी राष्टÑीयकृत बँकेची शाखा उघडावी, निराधार योजनेच्या मानधनात वाढ करून दरमहा तीन हजार रूपये मानधन द्यावे, आरोग्याच्या सुविधा सक्षम कराव्या, एटापल्ली येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारतीचे बांधकाम करून रुग्णालय सुरू करावे, एटापल्ली विभागात यावर्षी कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. काही शेतकºयांनी उशिरा रोवणी केली आहे. त्यामुळे उत्पादनातही कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने एटापल्ली उपविभागात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, शिक्षण विभागातील अतिदुर्गम शाळेतील शिक्षकांची रिक्तपदे भरावी आदी मागण्यांसाठी साखळी उपोषण केले जात आहे.जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, पं. स. सदस्य शालिक गेडाम, रमेश गम्पावार, सरपंच सुधाकर टेकाम, सुनंदा उईके, शामल मडावी, मंदा गेडाम, वर्षा उसेंडी, नगर पंचायत सभापती जितेंद्र टिकले, किसन हिचामी, मनोहर हिचामी, इश्वर ढोके, नगरसेवक ज्ञानेश्वर रामटेके, हरीदास टेकाम, मोहन नामेवार, तानाजी दुर्वा, तुळशिराम मडावी, देवू मडावी, उषा ठाकरे, केशव मडावी, नानाजी देवरकोंडावार यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.
एटापल्लीत काँग्रेस उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:30 PM
तालुक्यातील समस्या सांडविण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देतहसील कार्यालयासमोर मांडले ठाण : विकास कामांना गती देण्याची मागणी