सरकारविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:42 AM2018-11-14T00:42:33+5:302018-11-14T00:43:22+5:30

नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करून नोटबंदीच्या निर्णयाचा तसेच इतर निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

Congress protests protests against the government | सरकारविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

सरकारविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

Next
ठळक मुद्देनोटाबंदीचा विरोध : सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असल्याचा आरोप करून नोटबंदीच्या निर्णयाचा तसेच इतर निर्णयांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्या. ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले आलेत. या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य व्यक्तीचे बजेट बिघडले आहेत. तसेच महागाईमध्ये भर पडली आहे. मागील वर्षी मावा, तुडतुड्यामुळे धानपीक करपले. त्या शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. धानाला दीडपड हमीभाव द्यावा. धान खरेदी केंद्र सुरू करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, हसलअली गिलानी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शंकरराव सालोटकर, नगरसेवक सतिश विधाते, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, लहुजी रामटेके, पी. टी. मसराम, वसंता राऊत, प्रतिक बारसिंगे, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, राकेश गणवीर, गौरव आलाम, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, आरीफ कनोजे, पांडुरंग घोटेकर, तुळशीदास भोयर, बंडू पिपरे, संजय पिपरे, लक्ष्मण सातपुते, रविंद्र धोडरे, सुरज सातपुते, नारायण पिपरे, मारोती बारसागडे, आकाश पिपरे, प्रदीप सातपुते, सुरेश मरस्कोल्हे, मधुकर गेडाम, गिरीधर सातपुते, तानाजी परचाके यांनी केले.

Web Title: Congress protests protests against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.