शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

मरगळ झटकून काँग्रेस भिडली कामाला

By admin | Published: November 02, 2014 10:35 PM

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने

गडचिरोली/आरमोरी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने जोम धरा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.रविवारी गडचिरोली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे होते. उद्घाटक म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी रविंद्र दरेकर, प्रभाकर वासेकर, आनंदराव आकरे, अतुल मल्लेलवार, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर, धानोरा पं. स. सभापती कल्पना वड्डे, गडचिरोली पं.स. सभापती देवेंद्र भांडेकर, अमिता लोणारे, राजेश ठाकूर, राबीन शहा, अ‍ॅड. गजानन दुग्गा, सी.बी. आवळे, काशिनाथ भडके, प्रतिभा जुमनाके, सतिश विधाते, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, केदारनाथ कुंभारे, देसाईगंजचे नगरसेवक निलोफर शेख, प्रा. विठ्ठल निखुले, राकेश रत्नावार आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी शनिवारी आरमोरी येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला माजी आमदार आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, रविंद्र दरेकर, परसराम टिकले, जेसा मोटवानी, हिरा मोटवानी, प्रशांत मोटवानी, किशोर वनमाळी, व्यंकटी नागिलवार, मनोज अग्रवाल, शामिना उईके, चंदू वडपल्लीवार, केतू गेडाम, श्यामलाल मडावी, अमोल पवार, शहजाद शेख, शिवाजी राऊत, डॉ. मेघराज कपुर, आनंदराव आकरे, यादवपाटील गायकवाड, मंगला कोवे, आशा तुलावी, प्रभाकर तुलावी, श्याम धाईत, जयदेव मानकर, जांगधुर्वे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उसेंडी यांनी मागील १५ वर्ष पेसा कायदा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काहीही न बोलणाऱ्यांना अचानक ओबीसीचा कसा पुळका आला, असा सवाल केला तर माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धमकाविणाऱ्यांना चिरडून टाकू, असे प्रतिपादन केले. हसनअली गिलानी यांनी पक्षात राहून नेहमीच फुटीरवादी भूमिका घेणारे पक्षातून गेल्याने पक्ष आता सावकारराजमुक्त झाला, असे प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ हस्तक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे संचालन विलास ढोरे तर आभार मिलिंद खोब्रागडे यांनी मानले. (प्रतिनिधी)