काँग्रेसचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:23 AM2018-11-01T01:23:20+5:302018-11-01T01:24:39+5:30

आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमी भाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Congress's Ineligible Fasting | काँग्रेसचे बेमुदत उपोषण

काँग्रेसचे बेमुदत उपोषण

Next
ठळक मुद्देसरकारच्या धोरणांचा निषेध : आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमी भाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या निषेधार्थ, तसेच या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तालुका काँग्रस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी एक वाजतापासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
तालुक्यात धान मळणी हंगाम जोमात सुरु आहे. दिवाळी जवळ आली आहे. मात्र, अद्याप आविमचे हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासकीय स्तरावरुन कार्यवाही होताना दिसत नसल्याने काँग्रेसच्या वतीने या उदासीन धोरणाचा निषेध करून उपोषण सुरू करण्यात आले.
उपोषण आंदोलनात काँग्रेसचे पं. स. सभापती गिरीधर तितराम, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, जि. प. सदस्य प्रल्हाद कराडे, ज्येष्ठ नेते डॉ. नामदेव किरसान, उपसभापती मनोज दुनेदार यांच्यासह वडेगावचे सरपंच संजय कोरेटी, पुंडलिक निपाने, मनोहर लांजेवार, रोहित ढवळे, शिवलाल कुंवर, संजय वड्डे, संजय नाकतोडे, श्रीराम गायकवाड, कुंवरसिंग नैैताम, नाना वालदे, धमदास उईके, गणपत उसेंडी, पांडुरंग म्हस्के, नमोज सिडाम, तुकाराम मारगाये, रतिराम डोंगरवार, पांडुरंग लोहंबरे, आनंदराव जांभुळकर, मोहन कुथे, राजू हरडे, राजू होळी सहभागी झाले.

Web Title: Congress's Ineligible Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.