काँग्रेसच्या मोर्चाची कोरची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:00 AM2018-10-05T00:00:22+5:302018-10-05T00:00:59+5:30
तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, योग्य हमीभाव द्यावा. कोरची तालुक्यात प्रलंबित असलेले सामूहिक, वैयक्ति वनहक्क दावे त्वरित द्यावे. शेतकºयांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध करावे. प्रलंबित असलेला तेंदूपत्ता बोनस त्वरित द्यावा. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी. राफेल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मागील वर्षी तुडतुडा पिकामुळे नुकसान झाले. त्याची मदत द्यावी, आदिवासी जनतेवर लावलेले ११० कलम मागे घ्यावे. ओबीसी प्रवर्गाला १९ टक्के आरक्षण द्यावे, अनुसूची पाच लागू करावी. झेंडेपार येथे प्रस्तावित असलेला प्रकल्प रद्द करावा. भारतीय संविधान जाळणाºयांवर कठोर कारवाई करावी. कुमकोठ येथील देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. टिपागड अभयारण्य रद्द करून धार्मिक स्थळ म्हणून घोषित करावे. डीबीटी योजना बंद करून पंडित दीनदयाल व स्वयंरोजगार योजनेची रक्कम द्यावी. जिल्हा निवड समिती लागू करावी, या मागण्यांसाठी कोरची तहसीलवर धडक देण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, पं.स.सभापती कचरी काटेंगे, जि.प.सदस्य अनिल केरामी, सुमित्रा लोहंबरे, प्रल्हाद कराडे, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, देसाईगंज तालुकाध्यक्ष परसराम टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे, काँग्रेस कमिटी तालुका समन्वयक मनोज अग्रवाल, मुकेश नरोटे, श्रावण मातलावार, हकीम शेख, जगदीश कपुरडेरिया, प्रेमिला काटेंगे, नगरसेविका हर्षलता भैसारे, सुमन घाटघुमर, वशित शेख, नसरूद्दीन भामानी, सरपंच नरपतसिंग नैताम, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल अंबादे, परवेश लोहंबरे, बाबुराव मडावी, धनराज मडावी आदींनी नेतृत्व केले.