लोकमत न्यूज नेटवर्कघोट : परिसरातील माडेमुधोली नजीकच्या अरण्यवास कोठरी बौद्धविहाराचे बांधकाम ११ हजार ६६४ स्के. फुट जागेत सुमारे दीड कोटी रूपयातून सुरू असून हे काम प्रगतीपथावर आहे.चामोर्शीपासून ३५ किमी अंतरावरील कोठरी या जंगलव्याप्त परिसरात भंते भगीरथ यांनी ४० लाख रूपये खर्च करून विहाराचे बांधकाम केले. तसेच दोन्ही बोधीवृक्षाखाली बौद्ध स्तुपाचे बांधकाम करून त्यात बुद्धाच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. परंतु बौद्ध विहार हे बोधीवृक्षाखाली उभारलेल्या बौद्ध स्तुपाच्या बरोबरीत नसून कमी दर्जाचे वाटत असल्याने याच ठिकाणी दीड कोटी रूपये खर्चातून काम सुरू आहे. १०८ फुट लांब, १०८ फुट रूंद व १०८ फुट उंच अशा ११ हजार ६६४ स्के. फुट जागेवर विहाराचे नव्याने बांधकाम सुरू आहे.भंते भगीरथ यांनी उभारलेल्या विहाराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त झालेला असला तरी अजुनपर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळालेली नाही. केवळ दान स्वरूपात भंते भगीरथ यांनी गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातून तसेच जपान व श्रीलंका आदी देशामधून दानाच्या रूपात निधी गोळा केला. त्यानंतर कोठरी परिसरातील घनदाट जंगलात दोन नाल्याच्या संगमावर सुमारे २००० वर्षांपूर्वीच्या दोन बोधीवृक्षाच्या मधोमध २ हजार स्के. फुट जागेवर विहाराचे बांधकाम केले आहे. दोन्ही बोधीवृक्षाच्या खाली बौध्द स्तूप व त्यात बुद्धाच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. असे असले तरी हे विहार कमी दर्जाचे वाटत असल्याने दीड कोटी रूपये खर्चातून बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत या कामावर ५० लाख रूपये खर्च झाले आहेत. यामध्ये १२ दरवाजे राहणार असून त्याची रचना जपानमधील बौद्ध विहाराच्या धर्तीवर राहणार आहे. अशाप्रकारचे हे विहार संपूर्ण भारतातील एकमेव विहार राहणार आहे. १० नोव्हेंबरला येथे वर्षावास समापन सोहळा होणार आहे.
दीड कोटीतून कोठरी विहाराचे बांधकाम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:47 PM
परिसरातील माडेमुधोली नजीकच्या अरण्यवास कोठरी बौद्धविहाराचे बांधकाम ११ हजार ६६४ स्के. फुट जागेत सुमारे दीड कोटी रूपयातून सुरू असून हे काम प्रगतीपथावर आहे.
ठळक मुद्दे‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ : १० ला वर्षावास समापन सोहळा