लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे.विसापूर टोली ते वैनगंगा नदीघाटापर्यंत पाथरगोटा पांदन रस्त्याचे खडीकरण करणे, खरपुंडी मार्ग ते कठाणी नदीपर्यंत पांदन रस्ता तयार करणे, चांभार मोहल्ला ते कठाणी नदीपर्यंतच्या पांदन रस्त्याचे खडीकरण रामनगर, पोटेगाव बायपास मार्ग ते राम मंदिर, मुख्य मार्ग ते रामनगर, हनुमान मंदिर ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली बांधकाम करणे, सोनापूर प्रभाग क्र.११ मधील आंबोरकर, बारसागडे ते कुमरे, उंदीरवाडे, सोरते, धकाते, चिचघरे, मीना कोडाप ते मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नालीचे बांधकाम, चामोर्शी मार्ग ते रामायन खटी, सतीश विधाते, नंदू गुंडकवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नालीचे बांधकाम, नगर परिषद रामपुरी शाळा ते नरेंद्र भरडकर यांच्या घरापर्यंत व कॅम्प एरियापासून शंकर दुधबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट व बंदिस्त नाली बांधकाम, अॅड.प्रमोद बोरावार यांच्या घरापासून कोटगले, प्रमोद तरारे यांच्या घरापर्यंत सिमेंट क्राँकिट रस्ता व बंदिस्त नाली बांधकाम, गणेशनगरातील प्रफुल मेश्राम यांच्या घरापासून नंदकिशोर गिरडकर ते कविता होळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली बांधकाम.गोकुलनगराील वैशाली वासेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग, अभिजीत बोदलकर ते संघरक्षित फुलझेले यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. लक्ष्मीनगरातील आरमोरी मार्ग ते विनोद खोब्रागडे, मेश्राम, संजय पराते यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग व नाली बांधकाम, सोनापूर वॉर्डातील रामटेके डुप्लेक्स ते आऊटपर्यंत रस्ता व नाली बांधकाम. लांझेडा वॉर्डातील कारमेल शाळा ते नीलमवार, विलास चलाख यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. सोनापूर वॉर्डातील अयोध्यानगर कॉलनीमध्ये सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम. प्रभाग क्र.१ मध्ये आरमोरी मार्ग ते गुरूकुंज कॉलनीत रस्ता व नाली, बेसिक शाळा ते आशीर्वाद मंगल कार्यालय, माळी मोहल्ल्यातील हनुमान मंदिर, रामगिरवार यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.१ मध्ये दिलीप धात्रक, धाईत ते निंबोरकर ते रोहिदास मंदिरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.२ मध्ये मधुकर नीलमवार ते विलास चलाख ते शेंडे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. कारमेल शाळेच्या मागे पठाण किराणा ते विठोबा गराडे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली, आंबुलकर ते करकाडे यांच्या घरापर्यंत नाली. प्रभाग क्र.३ मध्ये दिलीप भांडेकर ते वासेकर यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली. प्रभाग क्र.३ मध्ये नगर परिषद, पंडित जवाहलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत वर्गखोल्यांचे बांधकाम. प्रभाग क्र.५ मध्ये चामोर्शी मार्ग ते हॉटेल देवांश, रेमाजी कोल्हे, सतीश नंदगिरवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली. शाहू नगर येथे चामोर्शी रोड नाक्यापासून पापडकर गोदामापर्यंत रस्ता, नाली बांधकाम. सोनापूर वॉर्डातील तलाव मार्ग, अयोध्यानगरातील तलाव मार्ग ते धकाते, मोरे, बारसागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली बांधकाम. प्रभाग क्र.११ मध्ये बांबोळे ते उसेंडी यांच्या घरापर्यंत रोड व नाली बांधकाम, नगर परिषद गडचिरोली येथे नवीन अग्निशमन गाडी खरेदी करणे. दिलीप धात्रक, धाईत, रमेश ठवरे यांच्या घरापासून मुखरू निंबोरकर ते रोहिदास मंदिरपर्यंत काँक्रिट रोड व बंदिस्त नाली. आंबोरकर यांच्या घरापासून कायरकर यांच्या घरापर्यंत व पुढे रोहिदास मंदिरापर्यंत सिमेंट रोड व बंदिस्त नाली. रामनगरातील जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत पहिला मजला बांधणे, जिल्हाधिकारी कॉलनीत नाली, रस्ता व बगिचाचे बांधकाम केले जाणार आहे.अनेक ठिकाणच्या ‘ओपन स्पेस’चा होणार विकासलांझेडा वॉर्डातील किरमोरे यांच्या घरामागील हिरो शो रूमजवळील असलेल्या मोकळ्या जागेला संरक्षण भिंतीचे बांधकाम, स्नेहनगरातील डॉ.मुनघाटे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, सावसाखडे यांच्या घरासमोर भरडकर यांच्या घराजवळील ओपन स्पेसला संरक्षण भिंती बांधणे व जागेचा विकास करणे, शनिवारे यांच्या घरामागील चापले यांच्या घराजवळील, कन्नामवार घराजवळील, नागोबा मंदिराजवळील देविदास नैताम यांच्या घरालगतचा ओपन स्पेस, चामोर्शी मार्गावरील दर्गा विकसित करणे, डॉ.किलनाके यांच्या घरामागील, देवतळे यांच्या घराजवळील ओपन स्पेस, सोनापूर येथील मीना कोडाप यांच्या घराजवळच्या ओपन स्पेसचा विकास करणे, रामटेके डुप्लेक्सजवळील मोकळ्या जागेचा विकास करणे, कॅम्प एरियातील सर्वे क्र.२६/२ मधील ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे.
१५ कोटीतून काँक्रिट रस्ते व नालीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:26 AM
गडचिरोली नगर परिषदेला राज्य शासनाने १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पांदन रस्ते, नाली बांधकाम व ओपन स्पेसचा विकास केला जाणार आहे. यामध्ये एकूण ४४ कामांचा समावेश आहे.
ठळक मुद्देराज्य शासनाकडून निधी : गडचिरोली शहराचे रूप पालटण्यास होणार मदत; निविदा प्रक्रियेनंतर बांधकामास सुरुवात