लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.धान पीक हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या जवळपास ८० टक्के भागावर धान पिकाची खरिपात लागवड केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी अनुकूल असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, येथील धानाची क्वॉलिटी अतिशय चांगली असल्याने धानापासून निर्माण झालेला तांदूळ विदेशात निर्यात केला जातो.धान पिकाला अगदी सुरूवातीपासून तर शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. पाणी जमिनीत टिकून राहावे यासाठी बांध्यांची निर्मिती करावी लागते. बांधी निर्मिती करण्यासाठी चारही बाजूने उंच माती टाकून पारे तयार करावे लागतात. याला बांध्या असे संबोधले जाते. बांध्यांची निर्मिती करण्यासाठी एका एकरामागे लाखो रूपयांचा खर्च येत असल्याने शेतकरी त्या तयार करू शकत नाही. परिणामी शेतीत धानाचे उत्पादन घेण्याची इच्छा असूनही शेती पडिक ठेवावी लागते. मागील काही वर्षांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बांध्या तयार करून दिल्या जात आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच शेतकºयांना धानाचे पीक घेण्यास सोयीचे होत आहे.२०१७-१८ या वर्षात २३५ कामे सूरू करण्यात आली. ३१ मार्चअखेर १३८ कामे पूर्ण झाली आहेत. यातून ३५४ हेक्टरवर बांध्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ९७ कामे प्रगतीपथावर होती. मे अखेर जवळपास १७ कामे पूर्ण झाली असून एकूण ४०० हेक्टरवर बांध्यांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. अजुनही रोजगार हमी योजनेची कामे सुरूच असून ज्या कामांना सुरूवात झाली आहे, अशी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सर्वच कामे पूर्ण झाल्यास जवळपास ७०० हेक्टर जमिनीवर बांध्यांची निर्मिती होणार आहे. यामुळे पडिक शेती पिकाखाली येणार आहे.जिल्हाभरातील २०४ बोड्यांची दुरूस्तीसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात मामा तलाव व बोड्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावितात. मात्र काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ साचला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली. तर काही बोड्यांच्या पारी फुटल्या असल्याने बोडीमध्ये पाणी साचून राहत नाही. प्रशासनाने बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. २०१७-१८ या वर्षात २०४ बोड्यांच्या दुरूस्तीची काम हाती घेतले होते. त्यातील मार्चअखेर १२८ बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. ७६ कामे प्रगतीपथावर होती. यावर ६३ लाख ४६ हजार रूपये खर्च झाले आहेत.शेतकºयांच्या मागणीनुसार ३९ नवीन बोड्यांची निर्मिती केली जात आहे. त्यातील १७ बोड्या निर्मितीचे काम पूर्ण झाले. तर २२ कामे प्रगतीपथावर होती. सुमारे १० लाख ५० हजार रूपयांचा खर्च झाला आहे.२१ मामा तलावांचे नुतनीकरणगावात मामा तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका मामा तलावाच्या माध्यमातून जवळपास १०० ते ५०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रमही शासनाने सुरू केला आहे. २०१७-१८ या वर्षात २१ मामा तलावांच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले होते. त्यातील मार्चअखेर ११ कामे पूर्ण झाली. तर १० कामे प्रगतीपथावर होती. यावर सुमारे ५२ लाख ५७ हजार रूपये खर्च झाला आहे.
४०० हेक्टरवर धान बांध्यांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:57 PM
रोहयोंतर्गत २०१७-१८ या वर्षात जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रावर धान पिकासाठी आवश्यक असलेल्या बांध्यांची निर्मिती करण्यात आली असून ८० कामे प्रगतीपथावर आहेत. यातून जवळपास २०० हेक्टर जमिनीवर पुन्हा धानाच्या बांध्यांची निर्मिती केली जाणार आहे.
ठळक मुद्देरोहयो अंतर्गत काम : पडिक जमीन झाली सुपीक