लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेतकऱ्यांनी कोनसरी येथील लोह प्रकल्पासाठी शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे सदर प्रकल्प कोनसरीत उभारणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीत येथील शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले.कोनसरी येथील शेतकऱ्यांनी आ.डॉ.देवराव होळी यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवारी केले होते. सत्काराला उत्तर देताना आ.डॉ.देवराव होळी बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भांडेकर, मनमोहन बंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच व्हावा, अशी जिल्हावासीयांची मागणी होती. यासाठी आंदोलने झाली. लोहप्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने लोहप्रकल्पाची मागणी होणे रास्त होती. मात्र या प्रकल्पासाठी जमीन शोधणे अतिशय कठीण काम होते. काही गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला. मात्र खोट्या प्रचाराला बळी न पडता कोनसरी येथील शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवत लाखमोलाची जमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या निर्मितीत शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रकल्पात कोनसरी येथील युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लवकरच प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती आ.डॉ.देवराव होळी यांनी दिली. या कार्यक्रमात सुरेश बारसागडे व दीक्षा झाडे यांचा सत्कार झाला.
शेतकऱ्यांच्या सहकार्याने प्रकल्पाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:45 PM
शेतकऱ्यांनी कोनसरी येथील लोह प्रकल्पासाठी शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे सदर प्रकल्प कोनसरीत उभारणे शक्य आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीत येथील शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले.
ठळक मुद्देसत्काराला उत्तर : कोनसरीत शेतकऱ्यांच्यावतीने आमदारांचा जाहीर सत्कार