हळदवाही टोला येथील वास्तव : बालकांना मिळाली हक्काची जागाभाडभिडी : नाबार्ड सहाय्य योजना २०११-१२ अंतर्गत हळदवाही टोला येथे २०११-१२ पासून अंगणवाडी बांधकामास प्रारंभ करण्यात आला. या बांधकामासाठी ४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर इमारतीच्या बांधकामाची गती अतिशय मंद राहिल्याने तब्बल सहा वर्षे बांधकामासाठी लागली. त्यानंतर आता चालू सत्रात बालकांना अंगणवाडीच्या रूपाने हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.२०११-१२ या वर्षात ४ लाख रूपयांचा निधी मंजूर करून अंगणवाडी केंद्राची निर्मिती करण्याकरिता मंजुरी मिळाली. परंतु २०१६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हळदवाही टोला येथे अंगणवाडी केंद्रासाठी पक्की इमारत नसल्याने बालकांना कुडामातीच्या घरात पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घ्यावे लागत होते. सदर इमारतीचे बांधकाम होत असताना तत्कालीन सचिवाचे स्थानांतरण झाल्याने बांधकाम ठप्प पडले. परंतु मागील वर्षी विराजमान झालेल्या ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण केले.
बांधकामासाठी लागली सहा वर्षे
By admin | Published: July 03, 2016 1:30 AM