खासदारांचे प्रतिपादन : स्कूल आॅफ स्कॉलर्समध्ये गुणवंतांचा सत्कारगडचिरोली : यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. यश गाठण्याची जिद्द व चिकाटी असणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन क्षेत्राची निवड करताना सुरूवातीला काही अडचणी निर्माण होतात. या अडचणी शांत डोक्याने विचार करून सोडविल्या पाहिजे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्समध्ये गुरूवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते बोलत होते. यावेळी प्राचार्य उषा रामलिंगम, भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकादरम्यान मार्गदर्शन करताना प्राचार्य उषा रामलिंगम यांनी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर क्षमता विकसित होण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात, यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन येथील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत मागे येत नाही, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार भविष्यात करिअरची निवड करावी व त्यात यश संपादन करावे, असे प्रतिपादन केले.स्कूल आॅफ स्कॉलर्समधून दहावीच्या परीक्षेला १०१ विद्यार्थी बसले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ए- १ ग्रेडमध्ये ३७, ए- २ ग्रेडमध्ये ३३, बी- १ ग्रेडमध्ये २८, बी- २ ग्रेडमध्ये ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०- १० सीजीपीएमध्ये १६ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालाची ही सहावी बॅच आहे. कार्यक्रमादरम्यान सलोनी मेश्राम, अझीम, वैैष्णवी आखाडे, आयुष बांबोळकर, धनंजय वाघाडे, प्रज्वल माहुरे, अश्विनी नरोटे, अक्षता नेते आदी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरिश उराडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक निखिल तुकदेव, महेंद्र बोकडे, जितेंद्र राक्षसभुवनकर, अनिल चापले, जितेंद्र गव्हारे, हेमप्रकाश बारसागडे, संदीप पेदापल्ली, सुभाष मेश्राम, विलास मेश्राम, भारती सातपैैैैसे, वर्षा गोरडवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
यशासाठी सातत्य व जिद्द आवश्यक
By admin | Published: June 04, 2016 1:20 AM