लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाभरातील सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.जिल्हाभरातील नगर परिषदा, नगर पंचायत यांच्यामध्ये सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार दिवसाची किमान ४२१ मजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र कंत्राटदार एवढी मजुरी देत नाही. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना त्यांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे स्पष्ट निर्देश असले तरी नगर परिषदेचे कंत्राटदार अजुनही रोखीनेच मजुरी करतात. हा नियमाचा उल्लंघन असतानाही नगर परिषद प्रशासन मात्र चुपी साधून आहे.ज्या दिवशी मजूर कामावर येत नाही, त्या दिवशीची मजुरी कपात करणे योग्य असले तरी नगर परिषदेचे कंत्राटदार त्या दिवशी मजुरी कपात करण्याबरोबरच पुन्हा ५०० रूपये कपात करीत आहेत. एखाद्या मजुराने कंत्राटदाराला याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. कंत्राटदारांच्या या त्रासाला कंटाळून जिल्हाभरातील नगर परिषद, नगर पंचायतीत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी एकजूट केली. कंत्राटदारांकडून मजुरांची होणारी पिळवणूक न थांबविल्यास भविष्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगण महातो यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील जवळपास ४०० कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. मोर्चात संघटनेचे उपाध्यक्ष योगेश सोनवाने, सहसचिव सुभाष महानंदे, संघटनमंत्री किशोर महातो, शहराध्यक्ष प्रितम राणे, संघटनमंत्री नितेश सोनवाने, चंद्रकांत गेडाम, सागर रामटेके, रेवती अड्रसकर, वैशाली जेंगठे, बाबा मुनघाटे, आकाश मोगरकर, विनोद चलाख, गीता मेश्राम आदी सहभागी झाले होते.कंत्राटदार व अधिकाऱ्यांची मिलीभगतगडचिरोली जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायतीच्या सफाईचे कंत्राट चंद्रपूर येथील एका संस्थेला दिले जातात. मात्र प्रत्यक्षात हे काम नगर परिषद व नगर पंचायतीचे पदाधिकारीच करतात. त्यामुळे सर्व नियम डावलून काम करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यामध्ये सफाई कामगार मात्र पिळला जात आहे. मजुरांची मजुरी बँक खात्यातच जमा करण्याचा नियम रोखीने मजुरी दिली जात आहे. नगर परिषदेकडून पूर्ण पैसा वसूल करून यातून कंत्राटदार गब्बर होत चालले आहेत. जिल्हाधिकाºयांनी या बाबीची चौकशी केल्यास फार मोठे घबाड समोर येणार आहे. जिल्हाधिकाºयांनी या गंभीर बाबीची चौकशी करावी अशी मागणी छगन महातो यांनी केली आहे.अशा आहेत मागण्याकंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे मजुरी द्यावी, मजुरीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, जे कंत्राटदार अथवा संस्था कामगारांचे ईपीएफ, एमडल्ब्लूएफ भरत नाही, त्या संस्थेचे कंत्राट रद्द करावे. कंत्राटी कामगारांना भरपगारी साप्ताहिक सुटी द्यावी, सार्वजनिक सुटी द्यावी, त्या दिवशीची मजुरी कपात करू नये, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना संघटनेमार्फत देण्यात आले.
कंत्राटी सफाई कामगारांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:36 AM
किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाभरातील सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देकिमान वेतनानुसार मजुरी द्या : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे नेतृत्व