तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस तथा संस्थाध्यक्ष डॉ. प्रमाेद साळवे यांच्यातर्फे डॉक्टर डेनिमित्त १ जुलै राेजी कोरोना जनजागृती व वृक्षारोपण, संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेंद्रकुमार यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बाेलत हाेते.
अध्यक्षस्थानी महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर हाेते. त्यांनी मार्गदर्शन करताना चातगावसारख्या दुर्गम भागात नर्सिंग अभ्यासक्रमाची ही सोय म्हणजे अत्यंत वाखाणण्याजोगे काम आहे. कोरोनाकाळात जेव्हा प्रत्येक जण धास्तावलेला होता. त्या वेळेस त्याला फक्त डॉक्टर व नर्सनेच आधार दिला असून, डॉक्टर हेच समाजाचे खरे आधारवड आहेत, असे म्हणाले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, चातगाव पाेलीस मदत केंद्राचे अधिकारी माेहिते, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी, महावितरणचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, संस्थाध्यक्ष डाॅ. प्रमाेद साळवे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
याप्रसंगी प्रास्ताविक स्टुडंट नर्मेस असोसिएशनच्या रोजा आत्राम, संचालन अबोली त्रिसुळे यांनी केले. आभार शीतल पदा यांनी मानले. कार्यक्रमासाठी शीतल पदा, शालू मडावी, प्रांजली वलके, वैशाली मडावी, करिश्मा मेश्राम, प्रतिमा रामटेक, नंदिनी मडावी, श्रद्धा सलाम, शीतल नान्हे, पायल मडावी, प्रियंका तलांडे, संजना सडमेक, ममता मेश्राम, निकिता सडमेक, पूजा रामटेके, ट्विंकल सयाम, पूनम वट्टी, प्राची नंदेश्वर, मयुरी गडपायले, दीप्ती बेलसरे, ईश्वरी कावळे, किरण दुग्गा, रविना फुलकवर, मयुरी मेश्राम, जयश्री कुमरे, रेशमा तुलावी, कांता उसेंडी, सुजाता शेंडे, पल्लवी जांगी, स्नेहा वड्डे, प्रगती मडावी, काजल वाकूडकर, शीतल रामटेके, टिना कुळमेथे, पल्लवी शेडमाके, यामिनी दवळे, प्रियंका कावळे, साक्षी कुमरे, साक्षी मडावी, अपर्णा तुलावी, कोमल टेकाम, कोमल वाकोडे, मालती सिकंदर, संध्या लोहंबरे, शीतल हुमणे, उज्ज्वला ताडाम, सुशील निकेसर, निमेशकुमार अलाम, प्रशांत सातपुडके, दर्शन मेश्राम, तेजस गोरडवार, कुणाल हुलके, अक्षय सुरा, विक्की पोहरकर, अनिल मेश्राम, धीरज वानखेडे, आकाश निमगडे यांनी सहकार्य केले.