लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक आदिवासी नेत्यांचा फार मोठे योगदान असून आदिवासी संस्कृती व अस्मिता जोपासणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.ते मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम होत्या तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते ऋतुराज हलगेकर, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, बबलू भैय्या हकीम, शाहीन हकीम, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत, मस्तारी माधो झोरे, शिवाजी नरोटे, सुरेश मटामी, उपसरपंच शंकर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक आदिवासी नेत्यांनी गुलामीला झुगारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि समाजासाठी आपले सर्वस्वी अर्पण केले आदिवासी थोर नेत्यांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, आदीवासी हे देशाचे मूळनिवासी असले तरी आज समाजाची वाताहात व दशा होत आहे यासाठी आपणच कारणीभूत असून समाजाला खरी दिशा देण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असून आता आदिवासी जनतेनी जागृत व संघटित राहणे ही काळाची गरज बनल्याचे आवर्जून सांगितले.तसेच शासन आदिवासी व दलित समाजाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व मोठी निधी उपलब्ध करून देत असले तरी मागील दहा वर्षांपासून सक्षम, अनुभवी व कणखर नेतृत्व अभावी आदिवासी बहुल भाग असूनही आपण विकासापासून कोसो दूर गेलो आणि सोबतच आदिवासी संस्कृती, रीतिरिवाज,परंपराही लोप पावत असून आता समाजाने जागृती दाखवून आदिवासी समाजाची अस्मिता जपण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावे असे आवाहनही यावेळी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.धर्मराव बाबा अस्सल आदिवासी पेहरावात!माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अस्सल आदिवासी पेहराव केला होता. फिकट पिवळ्या रंगाचा ड्रेस, डार्क पिवळ्या रंगाचा दुप्पटा आणि डोक्यावरील पिवळ्या कलरची टोपी असा पेहराव करून त्यांनी आपले पूर्ण भाषण गोंडी, माडियात देऊन जागतिक आदिवासी दिनाचे सार्थक केले.तसेच बांबूंनी विणलेले मोर व अन्य पक्ष्यांचा पिसारा असणारे, डोक्यावर शिंग असणारे आदिवासी संस्कृती जपणारे विविध लुकचे टोप्या थोड्यावेळ साठी धारण करून उपस्थित सर्वांना बांबूंनी विणलेल्या टोपयांचे महत्त्वच एकप्रकारे अधोरेखित केले.
स्वातंत्र्य लढ्यासाठी आदिवासी नेत्यांचे योगदान फार मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:45 AM
आदिवासी संस्कृती व अस्मिता जोपासणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ठळक मुद्देआदिवासी संस्कृती जोपासणे आपले आद्यकर्तव्य