शेतकरी आंदोलनाला पाठिंबा : तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/कोरची : राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सोमवारी कोरची येथील व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली. तर आरमोरी येथे काँग्रेस व इतर पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनांनी सोमवारी राज्यात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. याला केवळ कोरची येथे प्रतिसाद मिळाला. सोमवारी दिवसभर कोरची येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या बंदचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सीयाराम हलामी, नगरसेवक तथा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, हिरा राऊत, निदानसाय काटेंगे, राजाराम नैताम, मनोहर होळी, झाडुराम सलामे, सुदू कोरचा, बाबुराव मडावी, पुरूषोत्तम हलामी, पॅरेलाल नैताम, शीतल नैताम, तानसिंग कुमोटी, प्रकाश कौशिक यांनी केले. कोरची तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या निवेदनात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. आरमोरी येथे सुद्धा काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांच्या मार्फतीने शासनाला निवेदन पाठविले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. आनंदराव गेडाम, अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय कॉन्सीलचे सदस्य डॉ. महेश कोपुलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, संजय वाकडे, पांडुरंग उंदीरवाडे, चंद्रभान मेश्राम, जगदीश रामटेके, प्रमोद आकरे, तुलाराम गेडाम, मंजूषा बेदरे, सिंधू कापकर, अमोल दामले, राजेश्वर दांडे, सीताराम गुरनुले उपस्थित होते. चक्काजाम आंदोलन करून काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक बंद पाळली. त्यानंतर आरमोरी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. इतरत्र प्रतिसाद नाहीकिसान क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र कोरची वगळता कुठेही संप पुकारण्यात आला नाही. गडचिरोलीसह इतर अकरा तालुकास्थळ व ग्रामीण भागातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरूच होती. बंदचा परिणाम दिसून आला नाही.आंधळी येथे आज आंदोलनशेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील आंधळी ुफाट्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन शिवसेना तालुका शाखेच्या वतीने केले जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम करणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोरची बंद, आरमोरीत आंदोलन
By admin | Published: June 06, 2017 12:45 AM