चामोर्शी : शासनाने घोषित केल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व व्याधीने ग्रस्त असलेल्या नागरिकांना २ मार्चपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात सुरुवात झाली आहे. लस घेण्याचा शुभारंभ चामोर्शी तालुका ‘लोकमत’चे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक रत्नाकर बोमिडवार, ज्येष्ठ नागरिक माजी शिक्षक संजय चितलवार यांना लस देऊन करण्यात आला.
या वेळी लसीकरण अधिकारी चंद्रकांत गव्हारे, लसीकरण व्यवस्थापक प्रणाली गेडाम, पायल टेभुर्णे, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
कोविशिल्ड लसीबाबत मनात कोणतीही भीती न बाळगता लस घेतली. कोणताही त्रास झाला नाही. अर्धा तास विश्रांती घेतली. डॉक्टर प्रकृतीची विचारणा करीत होते.
कोरोना लस घेतल्यानंतर प्रकृती चांगली आहे. लसीकरणावरून घरी आल्यानंतर मी माझी कामे करीत आहे. सर्व ज्येष्ठांनी लसीकरण करावे हा चांगला पर्याय आहे, असे संजय चितलवार या ज्येष्ठ नागरिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले. दिवसभरात नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यास गर्दी वाढत असल्याचे दिसून येत होते.