शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

कोरोना टाकतोय कात, तरीही लोक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:00 AM

लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्राहकांना दुकानात प्रवेशच न देणे अपेक्षित आहे. पण कोणीही मास्क नाही म्हणून आलेल्या ग्राहकाला परत पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देमास्कचा अल्प वापर : ५० टक्केपेक्षा जास्त लोकांचे नाक-तोंड उघडेच, कोरोनाच्या प्रसाराला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जवळपास ४ ते ५ महिने कोरोनारुग्णांचा आकडा नियंत्रणात असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेऊन कारवाई न केल्यास लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा सामाजिक संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्राहकांना दुकानात प्रवेशच न देणे अपेक्षित आहे. पण कोणीही मास्क नाही म्हणून आलेल्या ग्राहकाला परत पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात १८ मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असणारेच लोक होते. मात्र महिनाभरापासून सामाजिक संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. गेल्या १५ दिवसात ते प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. कात टाकलेल्या सापाप्रमाणे कोरोना व्हायरस आता चपळ होऊन कोणाच्याही हाती न लागता सर्वांना बाधा करण्यासाठी सज्ज झाला आहे.अशी आहे जिल्हाधिकाऱ्यांची नियमावलीजिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली दीपक सिंगला यांनी जमावबंदी आणि टाळेबंदीसंदर्भात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी अतिरिक्त नियमावली लागू केली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास किंवा नाका-तोंडावर विनामास्क किंवा रुमाल लावून न आढळल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड वसूल करण्याचा अधिकार संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक किंवा मुख्याधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत यांना आहे.विशेष म्हणजे या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था किंवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र समजून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. मात्र नियम मोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई होत नसल्याने ५० टक्के लोक या नियमांचे पालनच करत नसल्याचे दिसून येते. त्यांचा हा बिनधास्तपणा इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.भाजीबाजारगडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागात आणि भर मार्केट परिसरात असलेल्या गुजरी भाजी बाजारात गेल्या महिन्यात एक भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यानंतर काही दिवस भाजी मार्केट परिसरातील गर्दी थोडी ओसरली होती. पण आता पुन्हा गर्दी वाढत असून भाजी विक्रेत्यांसह भाजी घेण्यासाठी येणारे ग्राहक मास्क लावण्याच्या किंवा शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाला बगल देत आहेत.पेट्रोल पंपपेट्रोल पंपवर येणाऱ्या वाहनधारकांपैकी बहुतांश लोक मास्क घालून नसल्याचे दिसून आले. गाडीवरून मोकळ्या हवेतच फिरायचे आहे, कुठे गर्दीत जायचे नाही, असा विचार करून बहुतांश दुचाकीधारक मास्क वापरत नसल्याचे आढळले. तेच नाही तर पेट्रोल पंपावरील कर्मचारीही कंपनीने वापरण्यासाठी मास्क दिले असताना त्याचा नियमित वापर करण्यास फारसे इच्छुक नसल्याचे दिसून आले.

नाश्ता सेंटरगडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक दररोज सकाळी आणि सायंकाळी विविध प्रकारच्या नाश्ता सेंटरने गजबजून राहतो. १० ते १५ रुपयात मिळणारा विविध प्रकारचा नाश्ता अनेकांसाठी मोठा आधार असतो. त्यामुळे लोक बिनधास्तपणे नाश्ता करतात. पण मास्क न वापरता वावरणाऱ्या लोकांच्या दाटीवाटीमुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग होईल, याची काळजी कोणालाही नसते.सरकारी कार्यालयेसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात मंगळवारी कोणीही कर्मचारी मास्क किंवा रुमाल लावून काम करताना आढळून आला नाही. सतत मास्क लावणे सोयीस्कर वाटत नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामात एकमेकांची मदत घ्यावी लागते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या