गतवर्षीचे संपूर्ण शैक्षणिक सत्र काेराेना महामारीमुळे ऑनलाईनवरच पार पडले. सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून इयत्ता पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. त्यापूर्वीच्या सत्रात मार्च महिन्यापासून काेराेना संसर्गामुळे शाळा बंद पडल्या. दरम्यान, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. यावर्षीसुद्धा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाचे शैक्षणिक सत्र ऑनलाईन पद्धतीनेच सुरू झाले आहे. शिक्षक दरराेज शाळेत जात आहेत. मात्र, विद्यार्थी घरी बसून माेबाईल व व्हाॅट्सॲपच्या सहाय्याने शिक्षणाचे धडे घेत आहेत.
काेराेना लाॅकडाऊनच्या काळात शाळकरी मुलामुलींचे मैदानी खेळ बंद झाले. फिरण्यावरही बंदी आली. घराच्या प्रवेशद्वाराच्या पलीकडे मुले, मुली जात नसल्याने आपसूकच अनेक बालकांचे वजन वाढले असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स ..
वजन वाढण्याची कारणे
जन्मतः वजन जास्त असणे, व्यायामाचा अभाव, मैदानी खेळ न खेळणे, अभ्यास आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धेमुळे खेळाकडे दुर्लक्ष करणे, बैठी जीवनशैली, बराचवेळ टीव्ही पाहत बसणे किंवा कॉम्प्युटरवर खेळत राहणे, स्मार्टफोनचा अतिवापर, अयोग्य आहार खाणे, फास्टफूड, जंकफूड, बेकरी पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम यासारखे पदार्थ खाणे यामुळे लहान मुलांचे वजन अधिक प्रमाणात वाढत आहे.
बाॅक्स ......
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
मुलांना योग्य आहार द्यावा, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, यांचा समावेश असावा, मुलांना फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, पिज्जा, चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किटे, मिठाई, मैदयाचे बेकरी प्रोडक्ट, बर्गर, वडापाव, तेलकट पदार्थ, कोल्ड्रिंक्स यापासून दूर ठेवावे, मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे, आपल्याबरोबर मुलांनाही सकाळी फिरायला घेऊन जावे, सायकलिंग, पोहणे, डांसिंग, दोरीउड्या, पायऱ्या चढणे-उतरणे, योगासने, प्राणायाम यासारख्या व्यायामाचा समावेश करावा, अशाप्रकारे हेल्दी लाइफस्टाइलचा अंतर्भाव मुलांच्या जीवनात केल्यास, मुलांचे वजन आटोक्यात राहील, तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास योग्यरित्या होण्यास मदत होईल.
काेट .....
काेराेना संसर्गाच्या काळात खबरदारी म्हणून इयत्ता चाैथीपर्यंतचे विद्यार्थी तसेच लहान मुले, मुली घरच्या घरी आहेत. घराबाहेर जाऊन फिरणे, मैदानी खेळ खेळणे आदी बंद असल्याने काही मुलांच्या वजनात वाढ झाली. आता काेराेनाची लाट ओसल्यामुळे पालकांनी घरासमाेरील रस्त्यावर व अंगणात त्यांना खेळण्यासाठी माेकळीक द्यावी. त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून वजन वाढणार नाही.
- डाॅ. प्रशांत चलाख, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली
काेट .....
लहान मुले, मुली म्हटले की, खेळणे व खाणे हे आलेच. मात्र, काेराेनाच्या समस्येमुळे माेठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. घरी बसून राहिल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. आता पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी. त्यांना छाेटे-माेठे खेळ खेळू द्यावे.
- डाॅ. श्रावंती काेल्लुरी, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली.
बाॅक्स .....
मुले टिव्ही, माेबाईल साेडतच नाहीत
काेट .....
ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांना माेबाईलचे वेड लागले आहे. माझा मुलगा अधिकाधिक वेळ टिव्ही पाहत असताे. तसेच माेबाईलवर गेमही खेळताे. जेवण करताना त्याला टिव्ही सुरू करून द्यावा लागताे.
- भाग्यश्री किरंगे, पालक
काेट ......
दाेन वर्षापूर्वी माझ्या मुला, मुलीला माेबाईलचे तेवढे वेड नव्हते. मात्र, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना माेबाईलचे विविध उपयाेग कळले. ऑनलाईन शिक्षणातून अभ्यासक्रम समजला. मात्र, माेबाईलमध्ये असलेले विविध गेम व कार्टून पाहण्याचा छंद लागला.
- मनाेहर शेंडे, पालक