शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 6:01 PM

गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठळक मुद्दे मध्यरात्रीनंतर भरती केले अन् सकाळी प्राणज्योत मालावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान मंगळवारी भर पडलेल्या नवीन रुग्णांमुळे एकूण बाधित संख्या १३२९ वर पोहोचली आहे.दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण्यात आली. लक्षणे पाहून सदर रूग्णाची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यादरम्यान उपचार सुरू असताना सकाळी ७.४५ वाजता त्यांची प्रकृती आणखी बिघडून त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य विभागाने कळविले.

अधिक पडताळणीकरीता त्यांचे नमुने आरटीपीसीआर तपासणी करण्याकरीता घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यात सदर रुग्णाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र तो रूग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने तसेच बाधितही जिल्हयाबाहेर झाले असल्याने त्यांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात आली.मृत रूग्णाची पत्नी यावेळी सोबत होती. तिचाही अहवाल आरटीपीसीआर तपासणीत सकारात्मक मिळाला आहे. मृत कोरोना बाधिताचा अंतिम विधी जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून गडचिरोली येथे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आला.

२९ कोरोनामुक्त, तर २८ नवीन रुग्णांची भरजिल्ह्यात मंगळवारी २९ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये चामोर्शी येथील सर्वाधिक २१ जण आहेत. तसेच गडचिरोली येथील ६, सिरोंचा व आरमोरी येथील प्रत्येकी १ असे एकूण २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. २८ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील १४ जण आहेत. त्यात एका गरोदर महिलेसह, सावली तालुक्यातील २, गडचिरोली शहरातील ११ रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी येथील दोघा पॉजिटिव्हमध्ये १ आरोग्य कर्मचारी व १ कोरोनाबाधिताच्या संपर्कातील रुग्ण आहे.

देसाईगंज येथील ५ नवीन रुग्णांमध्ये बाधितांच्या संपर्कातील २ जण, मागील १० दिवसात लक्षणे आढळल्यानंतर सर्वेक्षणात आढळून आलेले ३ जण, कोरची येथील ३ प्रवासी, तसेच मुलचेरा येथील १ आरोग्य कर्मचारी व १ प्रवासी बधित आढळून आले आहेत. अहेरी येथेही १ प्रवासी बाधित आढळून आला. तर चामोर्शी येथे रूग्णाच्या संपर्कातील एक जण बाधित आढळला. असे २८ नवीन कोरोनाबाधित मंगळवारी आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस