लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्लीपासून २० अंतरावरील पेठा गाव तालुक्यातील हाॅटपाॅट ठरला असून ५७४ लाेकसंख्या असलेल्या या गावात तब्बल ४६ कोरोना पाॅझिटिव्ह निघाले आहेत. विशेष म्हणजे १०० जणांच्या तपासणीत तब्बल ४६ जण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मिळाले. चाचण्या वाढविल्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले असतानाही हे रुग्ण एटापल्ली येथील काेविड केअर सेंटरमध्ये जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना शाळेतच क्वारंटाईन करून ठेवले आहे. आशा वर्करकडून रुग्णांची ऑक्सिजन लेवल, तापमान तपासणी करून गोळ्या दिल्या जात आहेत.
तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले पेठा गावचे निसर्गरम्य वातावरणाने आहे. या गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाकडून गावालाच सील केले आहे. तरीही पेठापासून पाच कि.मी. समोर असलेल्या तोडसा गावात २० काेराेना रुग्ण आढळले आहेत.
ग्रामपंचायतकडून गावात साहित्य वाटप केले जात आहेत. यासाठी तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम, ग्रामविकास अधिकारी देवीदास पिल्लारे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना आत्राम हे घरोघरी जाऊन मास्क, साबण, सॅनिटायझर वाटप केले.