शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

स्वच्छतेवर दोन कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:15 AM

शहरातील नाल्याचा उपसा करणे, घरातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा करणे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यावर २०१८ या वर्षात नगर परिषदेचे सुमारे २ कोटी २५ लाख रूपये खर्च होणार आहेत. कोट्यवधींच्या खर्चानंतर शहर स्वच्छ राहणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देतीन संस्थांना कंत्राट : वर्षभरात नाली उपसण्यासाठी लागणार १ कोटी ४८ लाख रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील नाल्याचा उपसा करणे, घरातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा करणे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यावर २०१८ या वर्षात नगर परिषदेचे सुमारे २ कोटी २५ लाख रूपये खर्च होणार आहेत. कोट्यवधींच्या खर्चानंतर शहर स्वच्छ राहणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गडचिरोेली शहरात एकूण २५ वॉर्ड आहेत. या वॉर्डांमधील नाल्यांचा उपसा करण्यासाठी यावर्षी सहा झोन बनविण्यात आले आहेत. एका झोनमध्ये १३ मजूर नाली उपसा करणार आहेत. तर पाच मजूर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचºयाची उचल करणार आहेत. नाल्यांचा उपसा करणे व उपसा केलेला कचरा डंम्पिग यॉर्डमध्ये टाकण्याचे कंत्राट श्री साई अभियंता बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिले आहे. या कंत्राटाची किंमत १ कोटी ४८ लाख ३१ हजार ४८७ रूपये एवढी आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्यात घंटागाड्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. सहा झोनमध्ये २५ रिक्षा घंटागाड्या ठेवल्या जाणार आहेत. २५ रिक्षा गाड्यांसाठी ३० मजूर ठेवण्यात आले आहेत. काही मजूर अनुपस्थितीत राहिल्यास त्यांच्या ऐवजी हे मजूर काम करणार आहेत. रविवारी आठवडी बाजार भरतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. या कचºयाची उचल करण्याची जबाबदारी घंटागाडी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर कंत्राटदार आठवडी बाजारातील कचºयाची दर सोमवारी उचल करणार आहे. घंटागाडीच्या मजुरांचा पुरवठा करण्याचे कंत्राट श्री गजानन बेरोजगार सेवा संस्था गडचिरोलीला देण्यात आले आहे. या कंत्राटाची किंमत ५४ लाख ७३ हजार रूपये आहे.शहरातून गोळा झालेला कचरा खरपुंडी मार्गावरील डंम्पिग यॉर्डमध्ये टाकला जातो. मात्र या कचºयावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. शहरातील कचºयामध्ये प्लासिटकच्या कचºयाचे प्रमाण अधिक राहते. त्याचबरोबर भाजीपाला व इतर कचºयापासून शेंद्रीय खत बनविणे शक्य आहे. प्रक्रिया न करताच कचरा जमा केला जातो. या कचºयाला कधी आग लागल्यास मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. त्यामुळे या कचºयाचे वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसे सक्त निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुन्हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहा मजूर कार्यरत आहेत. २१ लाख ९७ हजार ५५० रूपयांना कंत्राट देण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वच्छतेवरील खर्च वाढला आहे.मजुरांच्या पळवापळवीने नाली उपसा रखडतोप्रत्येक वॉर्डातील नाली उपसा होण्यासाठी झोन पाडून मजूर संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डातील नाली उपसा नियमितपणे होण्यासाठी हे धोरण अतिशय चांगले आहे. मात्र काही रोजंदार नगरसेवक सदर नियम धाब्यावर बसवून आपल्या वॉर्डातच मजूर कामाला लावतात. सातत्याने एकाच वॉर्डातील नाल्यांचा उपसा वर्षभर केला जातो. इतर काही वॉर्ड व भाग मात्र नाली उपशापासून वंचित राहते. मागील सहा महिन्यांपासून नाल्यांचा उपसा झाला नाही. त्यामुळे त्या गाळ व कचऱ्याने तुडूंब भरून असल्याचे आजही दिसून येते. शहरातील ही विरोधाभासाची परिस्थिती बदलण्यासाठी झोनच्या नियमांचे प्रत्येक नगरसेवकाने पालन करणे आवश्यक आहे.मजुरांच्या उपस्थितीवर नगरसेवकांचे लक्षमजूर अनुपस्थितीत असतानाही त्यांची हजेरी लावून नगर परिषदेकडून पैशाची उचल केली जाते. दुसरीकडे अनुपस्थितीची मजुरी मात्र मजुराला दिली जात नाही. सदर मजुरी कंत्राटदाराच्या घशात जाते. यापूर्वीच्या कंत्राटदारांनी असे प्रकार केले आहेत. त्यामुळे काही नगरसेवक दक्ष झाले आहेत. कामावर जाण्यापूर्वी सर्व मजूर नगर परिषदेत सकाळी ८ वाजता गोळा होतात. या ठिकाणी त्यांची हजेरी घेतली जाते. प्रत्यक्ष हजेरीच्या वेळी काही निवडक नगरसेवक उपस्थित राहत असून अनुपस्थित मजुरांची हजेरी लावली जात आहे काय, हे बघत आहेत. इतरही नगरसेवकांनी असा उपक्रम राबवायला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.च्शहराचा विस्तार झाला म्हणून मजुरांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार तिनही कंत्राटाची किंमत सुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता असायला पाहिजे, मात्र नगर परिषद योग्य नियोजन करीत नाही.