ऑनलाईन लोकमतचातगाव : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या कटेझरी नं. १ येथील अंगणवाडी मोडकळीस आली आहे. याच इमारतीत लहान बालके बसतात. इमारतीचे छत कधीही कोसळण्याचा धोका असल्याने नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी गावकºयांकडून होत आहे.कटेझरी येथे एका लहानशा आकारची इमारत आहे. त्यावर कौलारू छत आहे. छतावरील कवेलू बाहेर निघाले आहेत. सदर कवेलू खाली कोसळल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर छतातून पावसाचे पाणी अंगणवाडी गळते. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी बालकांना बसणे कठिण होते. अंगणवाडीत ठेवलेला खाऊ खराब होण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेली इमारत निर्लेखित करून त्याऐवजी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी अनेकवेळा नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
जीर्ण इमारतीत भरते कटेझरीची अंगणवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:26 AM
येथून दोन किमी अंतरावर असलेल्या कटेझरी नं. १ येथील अंगणवाडी मोडकळीस आली आहे. याच इमारतीत लहान बालके बसतात.
ठळक मुद्देदुर्घटनेचा धोका : प्रशासनाचे दुर्लक्ष