गावातील व्यसनी रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने मेडारम येथे एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकला १९ रुग्णांनी भेट दिली तर १५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे. तसेच या दुर्गम गावातील रुग्णांना मराठी भाषा पुरेपूर अवगत नसल्याने समुपदेशक साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना दिलेली माहिती तालुका प्रेरक संतोष चंदावार यांनी तेलगू भाषेतून सांगितली. सोबतच रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.
रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी रुग्णांची केस हिस्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. रुग्णांची नोंदणी तालुका संघटक सुनीता भगत यांनी केली. क्लिनिकचे नियोजन तालुका प्रेरक संतोष चंदावार यांनी केले.