याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रमोद बांबोळे, जिल्हाध्यक्ष अशोक वंजारी, जिल्हा महासचिव जनार्धन ताकसांडे, पुंडलिक शेंडे, भोजराज कानेकर, प्रमोद राऊत, आनंदराव आलोणे, नरेश बांबोळे, यज्ञराज जनबंधू, कल्पना लाडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जे कामगार व कर्मचारी दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी कोविड लस घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर काही वाईट परिणाम होणार नाही, याबाबतचे लिखित हमी पत्र देण्यात यावे. लस घेतल्यामुळे १०० टक्के आजार होत नाही, याबाबतचे लिखित हमीपत्र देण्यात यावे. एखादा कामगार कर्मचारी लस घेतल्यानंतर दगावला, तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तिला तो ज्या विभागात ज्या पदावर ज्या वेतनावर कार्यरत आहे, त्या पदावर नोकरी देण्याचे हमीपत्र प्रशासनाकडून लिखित देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.